थोडक्यात पण महत्त्वाचे
• •आधुनिक तंत्रज्ञानाने परिपूर्ण अशी मॉडेल सह-दुय्यम निबंधक कार्यालये (SROs), आता मुंबई (बांद्रा-कुर्ला संकुल), नवी मुंबई आणि नागपूर येथे
• •खरेदीखत, भाडेपट्टा करार, बक्षिसपत्र, मुखत्यारपत्र,मृत्यूपत्र आणि मालमत्ता नोंदणी विषयक सेवा
• •प्रतीक्षेचा वेळ कमी करून नोंदणीप्रक्रिया सुलभ व्हावी यासाठी आधुनिक व लोकाभिमुख केंद्रे
• •सेवेतील कार्यक्षमता, पारदर्शकता वाढून नागरिकांचा अनुभव अधिक सुखकर व्हावा यासाठी समग्र डिजिटल पायाभूत सुविधा व आदर्श सेवा वितरण सुव्यवस्था
महाराष्ट्र : महाराष्ट्रातील पुणे येथील पहिल्या मॉडेल सह-दुय्यम निबंधक कार्यालयाच्या (SRO) यशातून प्रेरणा घेऊन महाराष्ट्र सरकार, व्ही एफ एस ग्लोबल (VFS global) आणि डब्ल्यू ई एक्सेल सॉफ्टवेअर प्रायव्हेट लिमिटेड (WE Excel software) यांच्या संयुक्त पुढाकाराने तीन नवीन मॉडेल सह-दुय्यम निबंधक नोंदणी कार्यालये मुंबई (बांद्रा कुर्ला संकुल), नवी मुंबई आणि नागपूर येथे कार्यान्वित होत आहेत.
मुंबई, नवी मुंबई आणि नागपूर येथील नागरिकांना या नव्या मॉडेल सह-दुय्यम निबंधक नोदणी कार्यालयांमधून (SROs) त्यांची खरेदीखते, भाडे-करार, बक्षिसपत्रे, मुखत्यारपत्रे, मृत्यूपत्रे आणि इतर मालमत्ता विषयक कागदपत्रे नोंदणीकृत करण्यासाठी आधुनिक व आरामदायक वातावरण उपलब्ध होईल.
मालमत्ता नोंदणी गतिमान, सुलभ आणि अधिक सोयीस्कर व्हावी यासाठी उभारलेल्या या नव्या कार्यालयांमध्ये असणाऱ्या आधुनिक पायाभूत सुविधा, डिजिटल प्रणाली, लोकाभिमुख सेवा यांचा संगम,संपूर्ण नोंदणीचा अनुभव अधिक सुखद करेल. या कार्यालयांचा हेतू उच्चतम शासकीय मानके व नियमांचे अनुपालन करून कार्यक्षमता वाढवणे, प्रतीक्षेचा वेळ कमी करणे आणि कामातील पारदर्शकता वाढवणे हा आहे.
श्री . रविंद्र बिनवडे, नोंदणी महानिरीक्षक (IGR), महाराष्ट्र शासन, म्हणतात:
“पुणे येथे महाराष्ट्रातील पहिल्या मॉडेल सह-दुय्यम निबंधक कार्यालयाच्या यशस्वी उद्घाटनानंतर, हा नागरिककेंद्रित उपक्रम मुंबई, नवी मुंबई आणि नागपूरपर्यंत विस्तारताना आम्हाला आनंद होत आहे. आधुनिक पायाभूत सुविधा, डिजिटल प्रणाली आणि सुव्यवस्थित सेवा वितरणाच्या माध्यमातून अधिक जलद, पारदर्शक आणि सुलभ मालमत्ता नोंदणीचा अनुभव नागरिकांना देण्यासाठी या केंद्रांची रचना करण्यात आली आहे.
प्रतीक्षेचा वेळ कमी करून आणि सेवेचा दर्जा वाढवून आम्ही सुशासन आणि प्रभावी शासकीय पर्यवेक्षण आणि मानके जपत सरकारी सेवांना अधिक सोयीस्कर व कार्यक्षम करत आहोत. हा विस्तार म्हणजे महाराष्ट्रभरातील नोंदणी सेवा आधुनिक करण्यासाठीच्या आमच्या वचनबद्धतेतील अत्यंत महत्वाची पायरी आहे.”
वर्ष २०२६ च्या सुरुवातीला, व्ही एफ एस ग्लोबल((VFS global) आणि डब्ल्यू ई एक्सेल सॉफ्टवेअर प्रायव्हेट लिमिटेड (WE Excel software) या संयुक्त भागीदारांना ,इन्स्पेक्टर जनरल ऑफ रजिस्ट्रेशन (IGR) आणि महाराष्ट्र सरकार अंतर्गत कंट्रोलर ऑफ स्टँप्स कडून प्राप्त झालेल्या पाच वर्षांच्या करारानुसार ६० अत्याधुनिक मॉडेल सह-दुय्यम निबंधक कार्यालये महाराष्ट्रभर टप्प्याटप्प्याने कार्यान्वित करायची आहेत. हे संयुक्त भागीदार, महाराष्ट्रभर स्थापन होत असलेल्या मॉडेल सह-दुय्यम निबंधक कार्यालयांची समग्र जबाबदारी घेण्यासोबत अत्याधुनिक डिजिटल पायाभूत सुविधा पुरवून व प्रशिक्षित सेवा वितरक नेमून मालमत्ता नोंदणी सेवांचे आधुनिकीकरण करण्यास कटिबद्ध असतील. ही कार्यालये पर्यायी असून सरकारी कार्यालये पूर्वीप्रमाणे कार्यरत राहतील.
मॉडेल सह-दुय्यम निबंधक कार्यालयांचे अर्जदारांसाठीचे वाढीव फायदे:
• आधुनिक तंत्रज्ञान व सुव्यवस्थेमुळे गतिमान सेवा वितरण
• प्रशस्त, आधुनिक व संपूर्णपणे वातानुकुलीत सोयींमुळे नागरिकांना सुखकर अनुभव
• आरामदायक आणि वायफाय युक्त प्रतीक्षा कक्षाची सुविधा
• नोंदणी प्रक्रिया सुरळीत आणि कार्यक्षम पद्धतीने पार पाडण्यासाठी डिजिटल प्रणाली आणि पायाभूत सुविधा
• संपूर्ण प्रक्रियेदरम्यान नागरिकांना मार्गदर्शन आणि सहाय्य करण्यासाठी प्रशिक्षित सेवा अधिकारी
• नागरिकांच्या सोयीसाठी अल्पोपहार / जलपान अशा नागरिकाभिमुख सुविधा
• मालमत्ता नोंदणीचा संपूर्ण अनुभव अधिक सुखकर करण्यावर भर देणारे पारदर्शक आणि कार्यक्षम सेवा वातावरण
• तंत्रज्ञान, पायाभूत सुविधा आणि तज्ज्ञांचे सहाय्य ज्यामुळे आधुनिक, सुलभ आणि कार्यक्षम नोंदणी सेवेचा अनुभव मिळतो.
कार्यालय तपशील :
मॉडेल सह- दुय्यम निबंधक कार्यालय – मुंबई (बांद्रा कुर्ला संकुल)
पत्ता – युनिट क्र. ३०९ ए, तिसरा मजला, ट्रेड सेंटर, बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) मुंबई, Maharashtra ४०००५१
कार्यालयीन वेळ : सकाळी १०:०० ते सायंकाळी ६:००
मॉडेल सह-दुय्यम निबंधक कार्यालय – नवी मुंबई
पत्ता – १०४, तळमजला, ए विंग, बिल्डींग क्र. ७, मिलेनियम बिझनेस पार्क, सेक्टर २, महापे, नवी मुंबई, महाराष्ट्र ४००७१०
कार्यालयीन वेळ : सकाळी १०:०० ते सायंकाळी ६:००
मॉडेल सह-दुय्यम निबंधक कार्यालय – नागपूर
पत्ता : पहिला मजला, क्रॉसविंड बिल्डींग, प्लॉट कर. ३८० सी, कॉर्प. हाउस क्र. १०१९, नॉर्थ अंबाझरी रोड, गांधी नगर, वॉकहार्ट हॉस्पिटलसमोर, धरमपेठजवळ, नागपूर महाराष्ट्र – ४४००१०
कार्यालयीन वेळ : सकाळी १०:०० ते सायंकाळी ६:००
मॉडेल सह-दुय्यम निबंधक कार्यालय – पुणे
पत्ता – ऑफिस क्र. १४, चौथा मजला, रिव्होल्यूशन मॉल, पश्चिमानगरी, कोथरूड, पुणे, महाराष्ट्र ४११०३८
अधिक माहितीसाठी:
https://igrmaharashtra.gov.in/ या संकेतस्थळाला भेट द्या.
संकेतस्थळावर पब्लिक डेटा एन्ट्री (PDE) पूर्ण केल्यानंतर आणि पे टू IGR (Pay 2 IGR) द्वारे शुल्क भरल्यानंतर e-step in प्रणाली द्वारे अपॉइन्टमेंट बुक करता येईल.
Pay 2 IGR: https://pay2igr.igrmaharashtra.gov.in/PTI/
e-step In: https://appl2igr.maharashtra.gov.in/TokenBooking/TokenBook.aspx
'व्हीएफएस ग्लोबल’ बद्दल
शासने आणि नागरिकांसाठी सुरक्षित गतिशीलता (secure mobility) सक्षम करणारी आणि विश्वसनीय तंत्रज्ञान सेवांमधील जागतिक अग्रणी असलेली 'व्हीएफएस ग्लोबल', जगभरातील सरकारे व राजनैतिक दूतावासांना सहकार्य करण्यासाठी 'जनरेटिव्ह एआय' (Generative AI) सह विविध तांत्रिक नवकल्पनांचा अवलंब करते. ही कंपनी आपल्या ग्राहक-सरकारांसाठी व्हिसा, पासपोर्ट आणि वाणिज्य दूतावास सेवांशी संबंधित प्रशासकीय व प्रक्रियात्मक कामे हाताळते; यामुळे कार्यक्षमता वाढते आणि संबंधित सरकारांना अर्जांच्या मूल्यमापनासारख्या अत्यंत महत्त्वाच्या कामावर पूर्णपणे लक्ष केंद्रित करणे शक्य होते.
तंत्रज्ञानाचा विकास, स्वीकार आणि अंमलबजावणी यांबाबत जबाबदार दृष्टिकोन बाळगत, ही कंपनी ७१ सरकारी ग्राहकांसाठी एक विश्वासार्ह भागीदार म्हणून काम करतानाच नैतिक कार्यपद्धती आणि शाश्वततेला प्राधान्य देते. १६९ देशांमध्ये ४,२०० हून अधिक अर्ज केंद्रे (Application Centres) चालवणाऱ्या 'व्हीएफएस ग्लोबल'ने २००१ पासून ५५ कोटी ७० लाखांहून अधिक व्यवहारांवर* यशस्वीरीत्या प्रक्रिया केली आहे.
झुरिच आणि दुबई येथे मुख्यालय असलेल्या व्हीएफएस ग्लोबल या कंपनीची मालकी बहुतांश प्रमाणात ब्लॅकस्टोनकडे आहे, जी जगातील सर्वात मोठी पर्यायी मालमत्ता व्यवस्थापक आहे. तसेच, स्वित्झर्लंडस्थित कुओनी आणि ह्युगेनटोबलर फाऊंडेशन, सिंगापूरस्थित टेमासेक आणि यूएईस्थित दुबई होल्डिंग्ज यांसारखे अल्पसंख्य भागधारकही यात आहेत.
यात व्हीएफएस ग्लोबलचे ३४४.१५ दशलक्ष व्यवहार आणि सीआयएक्स सिटिझन एक्सपीरियन्सचे २१२.९४ दशलक्ष व्यवहार समाविष्ट आहेत.
'वुई एक्ससेल सॉफ्टवेअरबद्दल
'वुई एक्सेलचा विश्वास आहे की तंत्रज्ञानाने अर्थपूर्ण बदल घडवला पाहिजे. २००६ पासून, ही कंपनी ई-गव्हर्नन्स, एंटरप्राइझ सोल्यूशन्स आणि उद्योग-विशिष्ट नवकल्पनांमध्ये मोठ्या प्रमाणावर डिजिटल परिवर्तनाला चालना देत आहे. व्यवसाय अधिक कार्यक्षम बनवणे, सरकारी सेवा अधिक सुलभ करणे आणि सर्वसमावेशक बनवणे यावर कंपनी लक्ष केंद्रित करते. वुई एक्सेलला इतरांपेक्षा वेगळे ठरवणारी गोष्ट म्हणजे तिचा 'लोकांना प्राधान्य' देणारा दृष्टिकोन.
सार्वजनिक आणि खाजगी दोन्ही क्षेत्रांसोबत सहयोग करून, ही कंपनी असे उपाय तयार करते जे कामकाज सुलभ करतात, व्यक्तींना सक्षम करतात आणि प्रत्यक्ष जगात परिणाम घडवून आणतात. सरकारी सेवा सुव्यवस्थित करण्यापासून ते कौशल्य विकासाला चालना देण्यापर्यंत, 'वुई एक्सेलचे कार्य ऑटोमेशनच्या पलीकडे जाते - जे चिरस्थायी प्रगती घडवण्याबद्दल आहे. अधिक माहितीसाठी, https://weexcel.in/about/ ला भेट द्या.
प्रसारमाध्यमांसाठी संपर्क:
कॉर्पोरेट कम्युनिकेशन्स:
communications@vfsglobal.com

0 Comments