Business

Header Ads

₹१,०९,९९९ च्या किंमती पासून सुरु होणाऱ्या रॉर ईझी सिग्मा (Rorr EZ Sigma) सोबत गुढी पाडव्याची खास ऑफर जाहीर झाली

थोडक्यात पण महत्वाचे

५ वर्षांची विस्तारित वॉरंटी आणि १ वर्षाच्या ओबेन कनेक्ट सबस्क्रिप्शनसह ₹३७,००० पर्यंतचे सणासुदीचे फायदे

५ मार्च २०२६ : भारतातील सर्वात वेगाने वाढणारी संशोधन आणि विकास-चालित इलेक्ट्रिक मोटरसायकल उत्पादक कंपनी, ओबेन इलेक्ट्रिकने (Oben Electric) गुढी पाडव्याच्या निमित्ताने त्यांच्या प्रमुख इलेक्ट्रिक मोटरसायकल, रॉर ईझी सिग्मावर एक सणासुदीची ऑफर जाहीर केली आहे. मार्च अखेरपर्यंत मर्यादित कालावधीसाठी सुरू करण्यात आलेली, सणासुदीची ही किंमत, ग्राहकांना नवीन वर्षाची सुरुवात एका स्मार्ट, उच्च-कार्यक्षमता आणि शाश्वत गतिशीलतेच्या पर्यायासह करण्यास प्रोत्साहित करण्यासाठी ठरवण्यात आली केली आहे आणि या सणासुदीच्या हंगामात प्रगत तंत्रज्ञानाला एक अर्थपूर्ण बचतीची जोड देण्यात आली आहे.

या सणासुदीच्या ऑफर अंतर्गत, ग्राहकांना एकूण ₹३७,००० पर्यंतचे फायदे मिळू शकतात. रॉर ईझी सिग्मा आता ₹ १,०९,९९९ च्या किंमती पासून उपलब्ध आहे. खास सणासुदीच्या किंमतींसोबत, ग्राहकांना ५ वर्षांची किंवा ६०,००० किमीची मोफत विस्तारित वॉरंटी आणि अमर्यादित डेटासह १ वर्षाचे मोफत ओबेन कनेक्ट अॅप सबस्क्रिप्शन देखील मिळेल. या उपक्रमामुळे प्रगत तंत्रज्ञान, उत्कृष्ट मालकी मूल्य आणि अत्यंत स्पर्धात्मक सणासुदीची किंमत यांना एकत्र करून, इलेक्ट्रिक मोबिलिटी स्वीकारण्याची गती वाढवण्याच्या ओबेन इलेक्ट्रिकच्या वचनबद्धतेला आणखी बळकटी मिळते. 

ओबेन इलेक्ट्रिक एका उभ्या एकात्मिक उत्पादन मॉडेलवर काम करते, ज्यामध्ये मालकीचे एलएफपी बॅटरी सिस्टम, मोटर्स, व्हेईकल कंट्रोल युनिट, टीएफटी डिस्प्ले आणि जलद चार्जर्स यासारख्या महत्त्वाच्या घटकांचे इन-हाऊस डिझाइन आणि विकास समाविष्ट आहेत. बेंगळुरूमधील त्यांच्या ३.५ एकरच्या उत्पादन सुविधेमध्ये शून्य-दोष उत्पादन फ्रेमवर्कचे पालन केले जाते, ज्याला ५० हून अधिक दर्जेदार चेकपॉइंट आणि ९५% स्ट्रेट-पास रेशोचा आधार आहे. कंपनीने आपला रिटेल आणि सेवा व्यवसाय सातत्याने वाढवला आहे आणि ती, सध्या १८ राज्यांमधील ८० पेक्षा अधिक शहरांमध्ये ९० पेक्षा अधिक शोरूम चालवत आहे. याशिवाय, ओबेन इलेक्ट्रिकची उत्पादने, अमेझॉन आणि फ्लिपकार्ट सारख्या आघाडीच्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर देखील उपलब्ध आहेत. तिच्या वाढीच्या भविष्यातील कृती आराखड्याचा एक भाग म्हणून.

Post a Comment

0 Comments