Business

Header Ads

मैक्स हॉस्पिटल, नागपूर येथील डॉक्टरांनी 82 वर्षीय वृद्धाची चेहऱ्याच्या असह्य वेदनांपासून सुटका केली आणि वृद्ध पुन्हा बोलू लागले

नागपूर, 16 मे, 2026: मैक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, नागपूर येथील डॉक्टरांनी जवळपास तीन महिन्यांपासून चेहऱ्याच्या असह्य वेदनांनी त्रस्त असलेल्या 82 वर्षीय रुग्णावर यशस्वीपणे मेंदूविषयक (न्यूरोसर्जिकल) शस्त्रक्रिया केली. या शस्त्रक्रियेनंतर रुग्ण पुन्हा व्यवस्थित बोलू लागले असून त्यांच्या प्रकृतीत आणि जीवनमानात मोठी सुधारणा झाली आहे.

नागपूर येथील रहिवासी श्री. अमरजीत दास यांना चेहऱ्याच्या डाव्या बाजूला आणि जबड्यात सतत तीव्र वेदना होत होत्या. कालांतराने या वेदना अधिक वाढत गेल्या. हॉस्पिटलमध्ये येण्याच्या काही दिवसांपूर्वी त्यांची अवस्था इतकी गंभीर झाली होती की त्यांना तोंड पूर्णपणे उघडताही येत नव्हते. 

त्यामुळे दात घासणे, जेवणे, पाणी पिणे आणि बोलणेही त्यांच्यासाठी खूप कठीण झाले होते. आराम मिळावा म्हणून उपचारासाठी ते नागपूर येथील मैक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये आले. तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यांना ट्रायजेमिनल न्युराल्जिया हा दुर्मिळ न्यूरोलॉजिकल आजार असल्याचे सांगितले. या आजारात चेहऱ्यात अचानक विजेचा झटका बसल्यासारख्या तीव्र वेदना होतात.

निदान झाल्यानंतर रुग्णाला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आणि त्यांच्यावर मायक्रोव्हॅस्क्युलर डीकंप्रेशन ही विशेष न्यूरोसर्जिकल शस्त्रक्रिया करण्यात आली. ही शस्त्रक्रिया मैक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, नागपूर येथील न्यूरोसर्जरी विभागाचे डायरेक्टर डॉ. संदीप इरटवार यांनी केली. 

या शस्त्रक्रियेबाबत माहिती देताना डॉ. संदीप इरटवार, डायरेक्टर - न्यूरोसर्जरी, मैक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, नागपूर म्हणाले, “ट्रायजेमिनल नर्व्हवरील मायक्रोव्हॅस्क्युलर डीकंप्रेशन ही शस्त्रक्रिया साधारणपणे अशा रुग्णांसाठी केली जाते, ज्यांना औषधांनी आराम मिळत नाही. या रुग्णाला खूप तीव्र वेदना होत होत्या, त्यामुळे शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला. कमीतकमी चीरा देऊन (मिनिमली इनवेसिव्ह) करण्यात येणाऱ्या मायक्रो सर्जिकल तंत्रज्ञानाचा वापर करून आम्ही नर्व्हवरील दाब कमी केला, त्यामुळे रुग्णाला तात्काळ आराम मिळाला.”

त्या कीहोल शस्त्रक्रियेनंतर रुग्णाच्या प्रकृतीत मोठी सुधारणा दिसून आली. ऑपरेशननंतर काही वेळातच ते व्यवस्थित बोलू लागले आणि काही तासांतच त्यांनी खाणे-पिणे पुन्हा सुरू केले. चेहऱ्याच्या तीव्र वेदनांपासून त्यांना पूर्णपणे आराम मिळाला. उपचारानंतर 48 तासांच्या आत त्यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला.

मैक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, नागपूर हे गुंतागुंतीच्या न्यूरोलॉजिकल आजारांवर आधुनिक आणि विश्वासार्ह उपचार सुविधा देण्यासाठी कटिबद्ध आहे. येथे अनुभवी डॉक्टर, अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि विविध तज्ज्ञांची टीम एकत्र काम करून रुग्णांना उत्तम उपचार आणि चांगले परिणाम मिळवून देण्याचा प्रयत्न करते.

Post a Comment

0 Comments