Business

Header Ads

फ्लिपकार्ट, अॅक्सिस बँक आणि पेयूकडून कार्ड पेमेंटसाठी बायोमेट्रिक प्रमाणीकरण !

थोडक्यात पण महत्त्वाचे

● अॅक्सिस बँक आणि पेयूच्या सहकार्याने फ्लिपकार्ट हे कार्ड पेमेंटसाठी बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन देणाऱ्या भारतातील आघाडीच्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मपैकी एक बनले आहे.
● ग्राहक आता फेस आयडी किंवा फिंगरप्रिंट वापरून अॅक्सिस बँक कार्ड पेमेंट मंजूर करू शकतात. त्यामुळे ओटीपीतील विलंब आणि अयशस्वी प्रयत्नांची समस्या दूर होते.
● बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन वैशिष्ट्यामुळे डिव्हाइस बाइंडिंग आणि फसवणुकीपासून अत्याधुनिक संरक्षणासह जलद प्रदान शक्य होते.

राष्ट्रीय : भारतातील स्वदेशी ई-कॉमर्स बाजारपेठ असलेल्या फ्लिपकार्टने भारतातील सर्वात मोठ्या खाजगी क्षेत्रातील बँकांपैकी एक असलेल्या ॲक्सिस बँक आणि भारतातील अग्रगण्य वैविध्यपूर्ण फिनटेक प्लॅटफॉर्म असलेल्या पेयू यांच्या सहकार्याने कार्ड पेमेंटसाठी बायोमेट्रिक प्रमाणीकरण सुरू करण्याची घोषणा केली आहे. त्यांच्या ग्राहककेंद्री सामायिक इतिहासावर आधारित या उपक्रमासाठी तीन विश्वासार्ह संस्था एकत्र आल्या आहेत आणि त्यांनी भारतातील ग्राहकांप्रति असलेली आपली सामूहिक वचनबद्धता पुन्हा एकदा व्यक्त केली आहे.

या उपक्रमामुळे वापरकर्त्यांना सपोर्ट करणाऱ्या अँड्रॉइड आणि आयओएस डिव्हाइसेसवर त्यांच्या बोटांच्या ठशांचा किंवा फेस आयडीचा वापर करून व्यवहारांची पडताळणी करता येते. त्यामुळे वन-टाइम पासवर्डची गरज नाहीशी होते. ही सेवा सर्वप्रथम ॲक्सिस बँकेच्या कार्डधारकांसाठी बायोमेट्रिक पडताळणीद्वारे सुरू करण्यात आली आहे. या उपक्रमामुळे फ्लिपकार्ट कार्ड पेमेंटसाठी बायोमेट्रिक प्रमाणीकरण देणाऱ्या प्रमुख भारतीय ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मपैकी एक बनले आहे.

हे वैशिष्ट्य ग्राहकांना डिव्हाइस फिंगरप्रिंटिंग आणि सुधारित तपासणीद्वारे प्रमाणीकरणाची अधिक सुरक्षित पद्धत देते. त्यामुळे सिम-स्वॅप किंवा ओटीपी-आधारित फसवणुकीचा धोका कमी होतो. यातून डिजिटल पेमेंटमधील महत्त्वाच्या अडचणी दूर होतात आणि स्मार्टफोन वापरकर्त्यांना परिचित असलेल्या अधिक वेगवान व सुरक्षित यंत्रणेद्वारे एसएमएस-आधारित ओटीपीची जागा घेते. या सहकार्याअंतर्गत, पेयू डिव्हाइस सुरक्षा आणि प्रमाणीकरण प्रक्रियेसह व्यापारी-बाजूच्या पायाभूत सुविधांचे व्यवस्थापन करते, तर ॲक्सिस बँकने जारी केलेल्या बायोमेट्रिक पडताळणीसाठी विम्बो (पेयूची एक कंपनी) चा वापर करते.

बायोमेट्रिक प्रमाणीकरणामुळे भारतातील चिंताजनक डिजिटल पेमेंट फसवणुकीच्या समस्येवर तोडगा निघतो. तिथे आरबीआयकडून आकडेवारीनुसार आर्थिक वर्ष २०२४ मध्ये फसवणुकीचे प्रमाण पाच पटींहून अधिक वाढून १,४०० कोटी रूपयांपेक्षा जास्त झाले आहे. याला प्रतिसाद म्हणून भारतीय रिझर्व्ह बँकेने 'डिजिटल पेमेंट व्यवहारांसाठी प्रमाणीकरण यंत्रणा निर्देश, २०२५' हे परिपत्रक जारी केले. त्यात एसएमएस ओटीपीऐवजी बायोमेट्रिक आणि जोखमीवर प्रमाणीकरणाचा अवलंब करण्यास स्पष्टपणे प्रोत्साहन दिले आहे.

या नियामक दृष्टिकोनाशी धोरणात्मकदृष्ट्या सुसंगत असलेली फ्लिपकार्ट-पेयू-ॲक्सिस बँक भागीदारी अधिक मजबूत डिजिटल प्रमाणीकरण यंत्रणांसाठी आरबीआयच्या आदेशाची पूर्तता करताना सुरक्षा वाढवते, व्यवहारांच्या यशाचा वेग सुधारते आणि एक अधिक लवचिक पेमेंट परिसंस्था निर्माण करते.

या अनावरणाच्या निमित्ताने बोलताना फ्लिपकार्टचे पेमेंट्स आणि सुपरकॉइन्स विभागाचे उपाध्यक्ष गौरव अरोरा म्हणाले, “फ्लिपकार्टमध्ये आमचा नावीन्यपूर्ण दृष्टिकोन हा मजबूत अनुपालन आणि ग्राहकांच्या विश्वासावर आधारित आहे. बायोमेट्रिक प्रमाणीकरण वैशिष्ट्याचे एकत्रीकरण हे ग्राहकांच्या पेमेंटमध्ये सुरक्षितता निर्माण करण्याच्या आमच्या वचनबद्धतेचे प्रतीक आहे, विशेषतः अशा वेळी जेव्हा डिजिटल फसवणुकीचे धोके अधिकाधिक अत्याधुनिक होत आहेत. सुरक्षित बायोमेट्रिक क्रेडेन्शियल्सचा वापर करून, आम्ही ग्राहकांच्या संरक्षणाचे सर्वोच्च मापदंड पूर्ण करत एक सहज आणि सुलभ पेमेंट अनुभव देत आहोत. डिजिटल कॉमर्सचा विस्तार होत असताना, सुरक्षित पेमेंटसाठी आवश्यक असलेली नियामक कठोरता आणि संपूर्ण परिसंस्थेतील विश्वास अधिक दृढ करत जलद व्यवहारांना सक्षम करण्यावर आम्ही भर देत आहोत.”

अॅोक्सिस बँकेच्या कार्ड्स, पेमेंट्स आणि वेल्थ मॅनेजमेंट विभागाच्या अध्यक्ष आणि प्रमुख अर्निका दीक्षित म्हणाल्या, “अॅदक्सिस बँकेत आम्ही प्रत्येक डिजिटल टचपॉइंटवर विश्वास आणि सुरक्षितता अधिक मजबूत करण्यासाठी सातत्याने काम करत आहोत. आज ग्राहकांना डिजिटल पेमेंट केवळ सुरक्षितच नाही तर सहजसोपे असावे अशी अपेक्षा असते आणि बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन एक सुरक्षित, वन-टच अप्रूव्हलचा अनुभव देऊन नेमके हेच साध्य करते. फ्लिपकार्ट आणि पेयूसोबतच्या आमच्या सहकार्यातून आमच्या कार्डधारकांसाठी ही सुधारित सुविधा सादर करताना आम्हाला आनंद होत आहे. ही सुरुवात आमच्या दीर्घकालीन भागीदारीची ताकद आणि सुरक्षितता व ग्राहक अनुभव या दोन्ही बाबतीत उद्योगाचे मानक उंचावण्याची आमची सामायिक  वचनबद्धता दर्शवते.

डिजिटल कॉमर्स जसजसे विकसित होत आहे, तसतसे आम्ही आमच्या ग्राहकांसाठी पेमेंट अधिक सोपे, अधिक मजबूत आणि भविष्यासाठी सज्ज करणारे नवनवीन शोध आणण्यावर लक्ष केंद्रित करत आहोत.” या सहयोगावर भाष्य करताना पेयू पेमेंट्सचे मुख्य व्यवसाय अधिकारी, हेमांग दत्तानी म्हणाले, “भारतात डिजिटल कॉमर्सचा विस्तार होत असताना, सुरक्षेशी तडजोड न करता पेमेंट प्रक्रिया सुलभ करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. 

पेयूमध्ये कार्ड पेमेंटसाठी बायोमेट्रिक प्रमाणीकरणाचा अनुभव सक्षम करण्यासाठी फ्लिपकार्टसोबत भागीदारी केल्याचा आम्हाला अभिमान आहे. त्यामुळे ग्राहकांना ओटीपीवर आधारित पडताळणीशी संबंधित दीर्घकाळ चालत आलेल्या अडचणींवर मात करण्यास मदत होईल. बायोमेट्रिक प्रमाणीकरणाला वर्धित सुरक्षा नियंत्रणांसह एकत्रित करून ही भागीदारी भारतीय ग्राहकांसाठी अधिक जलद, अधिक सुरक्षित आणि सुलभ डिजिटल पेमेंट अनुभव निर्माण करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.”

ही सुरुवात भारताच्या ओटीपीपासून दूर जाण्याच्या संक्रमणातील एक पुढचे पाऊल आहे. त्यातून वापरकर्त्यांना अनुपालन आणि नियंत्रणाचे उच्च मानक राखत पेमेंट करण्याचा एक अधिक सुलभ मार्ग उपलब्ध करून दिला जातो. या सहकार्याद्वारे फ्लिपकार्ट, ॲक्सिस बँक आणि पेयू हे डिव्हाइसवर आधारित बायोमेट्रिक कार्ड प्रमाणीकरणासाठी एक मजबूत मॉडेल स्थापित करत आहेत, जे भारतातील पुढील पिढीच्या सुरक्षित डिजिटल व्यवहारांना समर्थन देऊ शकेल.

Post a Comment

0 Comments