Business

Header Ads

एचडीएफसी बँकेच्या व्हॉट्सॲप चॅट बँकिंग ने पूर्ण केला १ कोटी युनिक मंथली ॲक्टिव्ह युझर्सचा महत्त्वपूर्ण टप्पा !

राष्ट्रीय : एचडीएफसी बँकेच्या व्हॉट्सॲप चॅट बँकिंग मंचाने त्यांच्या वापरातील एक महत्त्वपूर्ण टप्पा पार केला असून या मंचाच्या माध्यमातून ३० दिवसातील ॲक्टिव्ह युझर्स ची संख्या ही १ कोटी तर ९० दिवसांतील ॲक्टिव्ह युझर्स ची संख्या ही ३१ मार्च २०२६ रोजी २ कोटी पेक्षा अधिक झाली आहे. आता या मंचाचे ४ कोटींहून अधिक नोंदणीकृत ग्राहक असून ही संख्या बँकेच्या एकूण ग्राहक संख्येच्या जवळजवळ ४० टक्के आहे. वापरकर्त्यांमधील वाढीसह व्यवहारातही २० टक्क्यांनी वाढ झाल्याने अधिकाधिक लोकांची आवड यातून दिसून येते.    
आज एचडीएफसी बँके कडून व्हॉट्सॲपच्या माध्यमातून सर्वाधिक सर्वसमावेशक सेवा देण्यात येतात. १९ विविध उत्पादनां सह २२५ सेवा या मंचावरुन देण्यात येत असून रोजच्या बँकिंग गरजांसह व्यवहार आणि आठवण करुन देण्यास योग्य सेवांचे अलर्ट्स देण्यात येतात. परिणामी ही सेवा क्षेत्रातील अत्याधुनिक संभाषणात्मक बँकिंग सेवा पध्दतीं पैकी एक ठरली आहे.  

एचडीएफसी बँकेने सुरुवातीलाच ओळखले होते की, संवादात्मक इंटरफेस हे केवळ साध्या संवादांपुरते मर्यादित न राहता, खरेदी, जेवण मागवणे आणि दैनंदिन व्यवहारांसारख्या व्यापारासाठी शक्तिशाली प्लॅटफॉर्म म्हणून विकसित होत आहेत. हा बदल ओळखून, बँकेने २०२२ मध्ये चॅट बँकिंग सुरू केले आणि त्याला मूलभूत बँकिंग गरजांसाठी एक सोयीस्कर सेवा माध्यम म्हणून स्थापित केले, तसेच बँकिंगला थेट ग्राहकांच्या दैनंदिन डिजिटल सवयींमध्ये आणले.

उत्पादनांचा स्वीकार वाढवण्यासाठी, बँकेने सातत्याने नाविन्यपूर्ण उत्पादन रचनेवर लक्ष केंद्रित केले आहे. बँकेने उद्योगात प्रथमच वापरल्या जाणाऱ्या अनेक सुविधा सादर केल्या आहेत, ज्यात व्हॉइस नोट वर आधारित इनपुटचा समावेश आहे, ज्यामुळे ग्राहक हिंदी, इंग्रजी किंवा हिंग्लिशमध्ये सहजपणे संवाद साधू शकतात. तसेच, कोअर बँकिंग सिस्टीममधून इंटीग्रेटेड सर्व्हिस अलर्ट्स सक्षम करणाऱ्या जागतिक स्तरावरील पहिल्या काही बँकांपैकी ही एक सेवा आहे, जिथे अधिक गुंतागुंतीच्या प्रश्नांसाठी एआय-शक्तीवर चालणारे बॉट्स आणि मानवी एजंट यांचा एकत्रित उपयोग केला जातो. 

सोपेपणात अधिक भर घालण्यासाठी बँकेने प्रथमच कनेक्ट टू आरएम वैशिष्ट्य सुरु केले, यामुळे ग्राहक रिलेशनशिप मॅनेजरची माहिती पाहून कॉलबॅक करण्याची विनंती लगेच करु शकतील. नुकतीच त्यांनी क्विक एफडी आणि कन्व्हर्ट टू ईएमआय सारख्या स्थानिक प्रवासाची सुरुवात केली असून यामुळे संपूर्ण प्रक्रिया ही केवळ तीन टप्प्यात होऊन किमान ड्रॉप ऑफ्स मध्ये काम होऊ शकते. 

या महत्त्वपूर्ण टप्प्या विषयी बोलतांना एचडीएफसी बँकेच्या पेमेंट्स आणि डिजिटल बँकिंग चॅनल चे प्रमुख रजनीश प्रेमानंद प्रभू यांनी सांगितले “ मंथली ॲक्टिव्ह युझर्स चा १ कोटींचा टप्पा ओलांडणे हा आमच्या डिजिटल प्रवासातील एक महत्त्वाचा क्षण आहे. एका साध्या सर्व्हिस इंटरफेसच्या रूपात सुरू झालेली ही प्रक्रिया आता एका संपूर्ण संवादात्मक बँकिंग इकोसिस्टममध्ये विकसित झाली आहे. ग्राहकांच्या दैनंदिन सेवा आणि मोठ्या रकमेच्या व्यवहारांसाठी अधिकाधिक लोक आता चॅटचा पर्याय निवडत आहेत. ग्राहक दररोज वापरत असलेल्या प्लॅटफॉर्मवर बँकिंगला अधिक ग्राहक-केंद्रित, सोपे आणि सुलभ बनवण्यावर आमचे लक्ष केंद्रित करत आहोत.”

ही व्याप्ती एका केंद्रित ३६०-अंश धोरणामुळे शक्य झाली आहे, ज्यामध्ये ग्राहकांच्या मानसिकतेचा उपयोग करून लक्ष्यित सेवा सूचना देणे, मोबाईल बँकिंग आणि पे झॅप सारख्या डिजिटल टचपॉइंट्सवर क्रॉस-चॅनल कॉल्स टू ॲक्शनद्वारे चॅट बँकिंगला प्रोत्साहन देणे, सुधारित वारंवारता आणि आकर्षक क्रिएटिव्ह्जद्वारे संवाद अधिक प्रभावी करणे, आणि रिअल-टाइम एनपीएस ट्रॅकिंग आणि ग्राहकांच्या अभिप्रायाच्या आधारावर ग्राहक अनुभवांमध्ये सतत सुधारणा करणे यांचा समावेश आहे.

यावेळी बोलतांना भारतातील मेटाच्या बिझनेस मेसेंजिग चे संचालक रवी गर्ग यांनी सांगितले “ व्हॉट्सॲप आता व्यवसाय आणि ग्राहक एकमेकांशी कशा प्रकारे संवाद साधत आहेत या मध्ये बदल घडवत असून अशा बदला मुळे तसेच या महत्त्वपूर्ण टप्प्यांमुळे कशा प्रकारे अर्थपूर्ण मुल्य आणि समृध्द अनुभवासाठी मेसेंजिंगचा कसा उपयोग होतो हे दिसून येते.  एचडीएफसी बँकेने व्हॉट्सॲपचा योग्य वापर करुन सोपेपणा आणि सुरक्षित बँकिंगचा अनुभव ग्राहकांना देऊ करत असल्याचे पाहून आम्ही खूपच उत्साही आहोत.”  

एचडीएफसी बँक नवीन उत्पादन श्रेणींसह आपल्या चॅट बँकिंग क्षमतांचा आणखी विस्तार करण्याची योजना आखत आहे, ज्यामुळे चॅट बँकिंगला ग्राहकांसाठी पसंतीच्या स्वयं-सेवा माध्यमांपैकी एक बनवण्याचे त्यांचे उद्दिष्ट अधिक बळकट होऊ शकेल.

Post a Comment

0 Comments