Business

Header Ads

‘टीव्हीएस आयक्यूब’ मालिकेत नवीन दमदार भर; ‘टीव्हीएस आयक्यूब एस ४.७ केडब्ल्यूएच’ भारतात सादर !

बंगळुरू, मे २०२६ : टीव्हीएस मोटर कंपनी (टीव्हीएसएम) या दुचाकी आणि तीनचाकी वाहन क्षेत्रातील जागतिक आघाडीच्या कंपनीने भारतात लोकप्रिय असलेल्या फॅमिली ईव्ही मालिकेत ‘टीव्हीएस आयक्यूब एस ४.७ केडब्ल्यूएच’ हे नवीन मॉडेल आज सादर केले. 

भारतातील ९ लाखांहून अधिक कुटुंबांचा विश्वास मिळवलेल्या ‘टीव्हीएस आयक्यूब’ने देशात विद्युत वाहनांच्या वापराला चालना देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. नवीन ‘टीव्हीएस आयक्यूब एस ४.७ केडब्ल्यूएच’ची किंमत १,३७,१४२ रुपये (दिल्लीतील एक्स-शोरूम किंमत, केंद्र व राज्य सरकारच्या अनुदानासह) इतकी आहे. या स्कूटरला ‘आयडीसी प्रमाणित १७५ कि.मी.’ची रेंज मिळते. तसेच, या मॉडेलसाठी रंगांचे नवीन पर्यायही उपलब्ध करण्यात आले आहेत. त्यामुळे कुटुंबांना अधिक सोयीने आणि आत्मविश्वासाने लांबचा प्रवास करता येणार आहे.

दैनंदिन वापर लक्षात घेऊन तयार करण्यात आलेल्या या स्कूटरमध्ये मोठी बॅटरी देण्यात आली आहे. त्यामुळे रोजच्या प्रवासासोबतच अचानक ठरलेल्या लांबच्या प्रवासातही रायडर्सना अधिक आत्मविश्वासाने आणि सहजपणे प्रवास करता येईल. अधिक रेंज असलेल्या या मॉडेलमध्ये कंपनीने ‘मॅग्निफिसन्स पर्पल बेज’ आणि ‘हार्लेक्विन ब्लू बेज’ हे दोन नवीन रंग सादर केले आहेत. याशिवाय ‘टायटॅनियम ग्रे मॅट’ हा रंगही उपलब्ध आहेच. 

त्यामुळे ग्राहकांना निवडीसाठी अधिक पर्याय मिळणार आहेत. ग्राहकांच्या गरजा समजून सातत्याने उत्पादने अधिक चांगली करण्याच्या टीव्हीएस मोटर कंपनीच्या प्रयत्नांचा भाग म्हणून ‘टीव्हीएस आयक्यूब एस’ या मॉडेलला आता ४.७ केडब्ल्यूएच क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. बॅटरीची क्षमता वाढली असली तरी ग्राहकांना परिचित आणि विश्वासार्ह रायडिंग अनुभव कायम ठेवण्यात आला आहे.

‘टीव्हीएस आयक्यूब एस ४.७ केडब्ल्यूएच’ तयार करताना कंपनीने तीन महत्त्वाच्या गोष्टींवर भर दिला. पहिली म्हणजे ग्राहकांना रेंज, कनेक्टेड फीचर्स आणि रंगांच्या पर्यायांमध्ये अधिक निवडीचे स्वातंत्र्य देणे; दुसरी म्हणजे वाहनाच्या सुरक्षिततेसाठी नवीन नियमावलीचे पालन करून ग्राहकांना खरेदीपासून डिलिव्हरीपर्यंत पूर्ण विश्वास आणि समाधान देणे; आणि तिसरी म्हणजे टीव्हीएस आयक्यूब वापरणे सोपे, प्रभावी आणि त्रासमुक्त ठेवणे. या माध्यमातून विद्युत वाहनांचा वापर अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याचा कंपनीचा उद्देश आहे. तसेच, भारतातील आवडती फॅमिली ईव्ही म्हणून ‘टीव्हीएस आयक्यूब’चे स्थान आणखी बळकट करण्यावरही कंपनीचा उद्देश आहे. 

सध्या ‘टीव्हीएस मोटर कंपनी’च्या टीव्हीएस आयक्यूब इलेक्ट्रिक स्कूटर्स भारतातील १,००० हून अधिक शहरांमध्ये ३,३०० वितरकांकडे उपलब्ध आहेत. नवीन टीव्हीएस आयक्यूब एस ४.७ केडब्ल्यूएच या व्हेरियंटबाबत अधिक माहितीसाठी कंपनीच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.

Post a Comment

0 Comments