नागपूर : चालू क्रिकेट हंगामादरम्यालन ओक्ले् आणि मेटा यांनी आज क्रिकेटचा महान खेळाडू विराट कोहली यांना भारतातील ओक्लेा मेटा परफॉर्मन्स एआय ग्लासेसचा ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून घोषित केले. या सहयोगामधून निदर्शनास येते की, एआय-आधारित वीअरेबल्स् खेळामध्ये एथलेटिक इंटेलिजन्स आणतात आणि खेळाडूंचा सराव, नवनिर्मिती आणि विशेष क्षण शेअर करण्याच्या पद्धतीला पाठबळ देतात.
या सहयोगाचा भाग म्हणून, प्रेक्षकांना विराट कोहलीच्या जगाचा अनुभव प्रत्यहक्ष त्यांेच्याच दृष्टिकोनातून घेता येईल. यामध्ये सराव सत्रांपासून ते सामन्याच्या तयारीपर्यंत आणि पडद्यामागच्या खास क्षणांचा समावेश असेल. ओक्लेश मेटा परफॉर्मन्स एआय ग्लासेसमध्ये हँड्स-फ्री एआय तंत्रज्ञान आहे, जे एखादा परिपूर्ण क्रिकेट शॉट टिपण्यास मदत करते, सरावादरम्यान वैयक्तिक सल्ले देते आणि खेळाच्या ओघात कोणत्याही अडथळ्याविना व्हिडिओ रेकॉर्ड करण्याची सुविधा देते.
हँड्स-फ्री कॅप्चर आणि झटपट शेअरिंगच्या वैशिष्ट्यांमुळे हे ग्लासेस मैदानावरील व मैदानाबाहेरील उच्च-कामगिरीचे क्षण रेकॉर्ड करण्यासाठी अधिक सुलभ आणि प्रतिसादात्मक मार्ग उपलब्ध करून देतात. हा सहयोग आमचा एथलेटिक इंटेलिजन्सचा दृष्टिकोन दाखवतो, तसेच तंत्रज्ञान खेळाडूच्या दैनंदिन सरावात मिसळून त्यांची कामगिरी पुढच्या स्तरावर नेण्यास मदत करू शकते, हे निदर्शनास आणते.
मेटाच्या भारत व आग्नेाय आशियामधील उपाध्यहक्षा संध्या देवनाथन म्हणाल्या, "कामगिरी हा नेहमी कौशल्य व सतर्कता यांचा समतोल राहिला आहे आणि आता वाढत्या प्रमाणात डेटाद्वारे आकार घेत आहे. ओक्लेो मेटा परफॉर्मन्स एआय ग्लासेसच्या माध्यमातून, आम्ही एथलेटिक इंटेलिजन्स प्रत्यक्ष सरावात कसे दिसू शकते, याचा शोध घेत आहोत, जिथे वेळेवर मिळणारे सल्ले आणि सुलभ साहाय्य एकत्रितपणे खेळाडूंच्या सरावाला व एकाग्रतेला प्रबळ करते.
विराट कोहलीसोबत आमच्याष सहयोगामधून निदर्शनास येते की तंत्रज्ञान खेळाडूंना आपसूक साह्य करू शकते, ज्यामुळे खेळाडूंना प्रत्येक सत्रातून आणि प्रत्येक वैयक्तिक विक्रमाच्या दिशेने वाटचाल करताना वर्तमान क्षणात राहून नवनवीन गोष्टी शिकण्यास मदत होईल.
"क्रीडा क्षेत्र सतत प्रगत होत आहे, त्यासोबत खेळाडूंची स्वलत:ची कामगिरी समजून घेण्याची आणि उंचावण्याची पद्धतही बदलत आहे. ओक्ले्मध्ये आमचे लक्ष नेहमी शक्यतेच्या सीमा विस्तारण्यावर राहिले आहे आणि मेटासोबत मिळून आम्ही त्या दृष्टीकोनाला नवीन आयाम देत आहोत. विराट कोहली अशा मानसिकतेचे प्रतिनिधित्व करतो, ज्यासाठी आम्ही उत्पादने बनवतो: एकाग्र, जिद्दी आणि नेहमी स्वतःच्या मर्यादा ओलांडणारा. आणि हे उत्पादन त्याउसंदर्भात सर्वोत्तम आहे," असे ओक्लेीचे ग्लोबल स्पोर्ट्स मार्केटिंग प्रमुख कोरी हिल म्हणाले.
आपले मत व्यवक्त करत विराट कोहली म्हगणाले, "मी नेहमी माझ्या उपजत कौशल्यांवर विश्वास ठेवला आहे, पण त्याचसोबत काळानुसार माझा खेळ अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यावरही भर दिला आहे. मला ओक्लेण मेटा परफॉर्मन्स एआय ग्लासेसची उपयुक्त वाटणारी गोष्ट म्हणजे, ते खेळाच्या ओघात कोणताही अडथळा न आणता सूक्ष्म स्तरावर माहिती पुरवतात. सरावादरम्यान एकाग्र राहणे असो किंवा मैदानावरील सतर्कता वाढवणे असो, हे तंत्रज्ञान सातत्य राखण्यास मदत करते. तुम्ही तुमच्या पुढच्या वैयक्तिक विक्रमासाठी प्रयत्न करत असताना काळानुसार या गोष्टी मोठा फरक घडवून आणू शकतात."
ओक्लेत मेटा परफॉर्मन्स एआय ग्लासेसमध्येद कार्यक्षमता आणि बुद्धिमत्ता यांचे संयोजन आहे. यामुळे हातांचा वापर न करता फोटो आणि व्हिडिओ कॅप्चर करणे, थेट प्रक्षेपण करणे आणि व्हॉइस-सक्षम एआय साहाय्य मिळवणे शक्य होते. मेटा एआयद्वारे वापरकर्ते रिअल-टाइममध्ये संदर्भासह माहिती मिळवू शकतात, ज्यामुळे संवाद अधिक सुलभ आणि प्रतिसादात्मक होतो. पारंपारिक स्क्रीनच्या पलीकडे जाऊन त्या क्षणाचा अडथळारहित अनुभव घेणे यामुळे शक्य होते.
ही मोहिम टप्प्याटप्प्याने राबवली जाईल, ज्याची सुरुवात या घोषणेपासून होईल आणि त्यानंतर विविध प्लॅटफॉर्मवर डिजिटल उपक्रमांची मालिका सुरू होईल. यामध्ये सरावाचे व्हिडिओ, एआय-आधारित संवाद आणि विराट यांच्याे दैनंदिन जीवनातील खास क्षणांवर प्रकाश टाकला जाईल.
ओक्लेफ मेटा एचएसटीएन व व्हॅंनगार्ड कलेक्शलन्सहची किंमत अनुक्रमे ४१,८०० रुपये आणि ५२,३०० रुपयांपासून सुरू होते. हे ग्लासेस प्रमुख ऑप्टिकल स्टोअर्समध्ये उपलब्ध आहेत.

0 Comments