Business

Header Ads

इव्होनिथ स्टीलतर्फे वर्ध्यात ‘इव्होनिथ योद्धाज’ कबड्डी निवड चाचणीचे आयोजन या निवड चाचणीत वर्धा परिसरातील सुमारे 300 खेळाडूंनी सहभाग घेतला

नागपूर : इव्होनिथ स्टीलने महाराष्ट्रातील नागपूरजवळील वर्धा येथे ‘इव्होनिथ योद्धाज’ उपक्रमांतर्गत प्रतिभावान कबड्डी खेळाडूंचा शोध घेण्यासाठी यशस्वीरीत्या कबड्डी निवड चाचण्यांचे आयोजन केले. या निवड चाचण्या वर्धा जिल्ह्यातील देवळी येथील विदर्भ केसरी खासदार (एमपी) रामदास तडस इनडोअर स्टेडियममध्ये पार पडल्या. या चाचण्यांमध्ये 12 ते 25 वर्षे वयोगटातील सुमारे 300 खेळाडूंनी उत्साहाने सहभाग घेतला.

हा उपक्रम भारतातील ग्रामीण आणि स्थानिक भागांतील प्रतिभावान खेळाडूंचा शोध घेऊन त्यांना घडविणे आणि प्रोत्साहन देणे या उद्देशाने राबविण्यात आला आहे. या निवड चाचण्या बेंगळुरूस्थित सामाजिक संस्था स्पोर्ट्झ व्हिलेज फाउंडेशनच्या सहकार्याने आयोजित करण्यात आल्या. निवड झालेल्या खेळाडूंना ‘इव्होनिथ योद्धाज’ क्लबचा भाग बनण्याची संधी मिळणार असून त्यांना नियोजित प्रशिक्षण, अनुभवी मार्गदर्शकांचे मार्गदर्शन तसेच विविध स्पर्धात्मक स्पर्धांमध्ये सहभागी होण्याची संधी दिली जाणार आहे.

या निवड चाचण्यांना वर्धा जिल्हा एमेच्योर कबड्डी असोसिएशनचे सहकार्य लाभले. या चाचण्यांमध्ये वर्धा आणि आसपासच्या भागातील अनेक प्रतिभावान खेळाडूंनी सहभाग घेतला. अनुभवी प्रशिक्षक आणि निवड समितीने खेळाडूंची तंदुरुस्ती, चपळता, खेळातील कौशल्ये आणि सामन्याविषयीची समज याच्या आधारे त्यांचे मूल्यांकन केले.

वर्धा येथे इव्होनिथ स्टीलचा लोहनिर्मिती (आयरन मेकिंग) आणि तयार स्टील उत्पादनांचा (फिनिश्ड स्टील प्रॉडक्ट्स) उत्पादन प्रकल्प आहे. इव्होनिथ स्टील सर्वसमावेशक प्रगती आणि शाश्वत विकासासाठी आपली बांधिलकी अधिक मजबूत करत आहे. कंपनी रोजगारनिर्मिती, आरोग्यसेवा आणि ग्रामीण क्रीडा क्षेत्रातील विविध उपक्रमांद्वारे 30 गावांमधील 50 हजारांहून अधिक नागरिकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणत आहे.

इव्होनिथ स्टीलबद्दल :

इव्होनिथ मेटॅलिक्स लिमिटेड (EML) आणि इव्होनिथ व्हॅल्यू स्टील लिमिटेड (EVSL) यांच्या एकत्रित स्वरूपातून वर्धा येथे उभारलेला स्टील संकुल म्हणजे इव्होनिथ स्टील होय. कंपनी ही १.४ दशलक्ष टन वार्षिक (MTPA) उत्पादन क्षमतेची एकात्मिक स्टील उत्पादक कंपनी आहे. महाराष्ट्रातील नागपूरजवळ, मध्य भारतातील धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाच्या ठिकाणी कंपनीचे उत्पादन प्रकल्प असून, येथे स्वतंत्र रेल्वे साइडिंगसह आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध आहेत. त्यामुळे देशातील प्रमुख बाजारपेठांपर्यंत सहज पोहोच साधता येते तसेच महत्त्वाच्या कच्च्या मालाच्या स्रोतांजवळ असल्याचा लाभही कंपनीला मिळतो.

इव्होनिथ मेटॅलिक्स लिमिटेड (EML) ही कंपनी हॉट मेटल आणि पिग आयर्नचे उत्पादन करून ते इव्होनिथ व्हॅल्यू स्टील लिमिटेड (EVSL) तसेच इतर ग्राहकांना पुरवते. त्यानंतर EVSL या हॉट मेटलपासून स्टील तयार करून हॉट-रोल्ड कॉइल्स, कोल्ड-रोल्ड कॉइल्स, गॅल्वनाइज्ड कॉइल्स आणि शीट्स यांसारखी मूल्यवर्धित फ्लॅट स्टील उत्पादने निर्मिती करते. भविष्यात कंपनी डक्टाइल आयर्न पाईप्स उत्पादन क्षेत्रातही प्रवेश करणार आहे.

अधिक माहितीसाठी भेट द्या : https://www.evonithsteel.com/

Post a Comment

0 Comments