Business

Header Ads

मैक्स हॉस्पिटल, नागपूर येथे यशस्वी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया; फादर्स डे पूर्वी मुलीने यकृतदान करून वडिलांना दिले नवजीवन !

नागपूर, 20 जून 2026: नागपूर येथील मैक्स हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी प्रगत लिव्हर सिरोसिसने त्रस्त असलेल्या 55 वर्षीय रुग्णावर यशस्वीपणे जटिल लिव्हिंग डोनर लिव्हर ट्रान्सप्लांट शस्त्रक्रिया केली. या शस्त्रक्रियेसाठी रुग्णाच्या 20 वर्षीय मुलीने यकृतदाता म्हणून पुढाकार घेतला. या यशस्वी प्रत्यारोपणामुळे रुग्णाला नवजीवन मिळाले. तसेच, लिव्हिंग डोनर लिव्हर ट्रान्सप्लांट आणि अत्याधुनिक रोबोटिक शस्त्रक्रिया तंत्रज्ञानामुळे दाता आणि रुग्ण या दोघांच्याही उपचारांचे परिणाम अधिक चांगले होऊ शकतात, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले.  

अमरावती येथील रहिवासी श्री. अनंत मून हे गेल्या तीन वर्षांपासून यकृताच्या गंभीर आजाराने त्रस्त होते. अनेक रुग्णालयांमध्ये उपचार घेऊनही त्यांची प्रकृती हळूहळू अधिक बिघडत होती. अंतिम टप्प्यातील यकृताच्या गंभीर आजारामुळे निर्माण झालेल्या अडचणींना सामोरे जात असताना, प्रगत उपचार आणि तज्ज्ञ वैद्यकीय सेवांसाठी त्यांनी नागपूर येथील मैक्स हॉस्पिटलला भेट दिली. ट्रान्सप्लांट टीमने सखोल तपासणी केल्यानंतर, यकृत प्रत्यारोपण हाच त्यांच्या आजारावरचा एकमेव प्रभावी उपचार पर्याय असल्याचे सांगितले. 

कुटुंबाने योग्य दाता शोधण्याचा प्रयत्न सुरू ठेवला असताना श्री. अनंत मून यांची प्रकृती अधिकच गंभीर होत होती. अशा परिस्थितीत त्यांची मुलगी कु. अन्विता मून हिने यकृतदान करण्याचा निर्णय घेतला आणि त्यासाठी आवश्यक वैद्यकीय तपासण्या करून घेतल्या. हा निर्णय तिच्या आयुष्यातील महत्त्वाच्या टप्प्यावर घेण्यात आला. ती इंजीनियरिंगच्या तिसऱ्या वर्षात शिक्षण घेत होती आणि विद्यापीठाच्या परीक्षांची तयारी करत होती. वडिलांच्या गंभीर आजाराची चिंता आणि शिक्षणाची जबाबदारी यांचा समतोल राखत तिने वैद्यकीय, मानसिक आणि शारीरिक अशा सखोल तपासण्या करून घेतल्या, जेणेकरून ती दात्यासाठी योग्य आहे की नाही हे ठरवता येईल. विशेष म्हणजे, शस्त्रक्रियेपूर्वी तिने तिची लेखी परीक्षा दिली, तर शस्त्रक्रियेनंतर प्रकृती सुधारल्यानंतर तिने प्रात्यक्षिक परीक्षा (प्रॅक्टिकल परीक्षा) देखील यशस्वीपणे पूर्ण केली.

तपासणीनंतर ट्रान्सप्लांट टीमकडून परवानगी मिळाल्यानंतर, तिने शस्त्रक्रिया पुढे नेण्याचा निर्णय घेतला आणि आपल्या वडिलांच्या तातडीच्या उपचारांना सर्वात जास्त प्राधान्य देत तिने त्यांना नवजीवन देण्याचे मोठे पाऊल उचलले. त्यानंतर विविध तज्ज्ञ डॉक्टरांच्या टीमने यकृत प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडली. यकृतदाता असलेल्या अन्विताची शस्त्रक्रिया अत्याधुनिक रोबोटिक तंत्रज्ञानाच्या मदतीने करण्यात आली. त्यामुळे ही शस्त्रक्रिया कमी चिरफाड (मिनिमली इन्वेसिव्ह) पद्धतीने करण्यात शक्य झाली आणि तिच्या लवकर बरे होण्यासही मदत झाली.

या प्रकरणाबाबत बोलताना देताना डॉ. गौरव चौबल, डायरेक्टर – लिव्हर ट्रान्सप्लांट आणि मल्टी-ऑर्गन ट्रान्सप्लांट, नानावटी मैक्स हॉस्पिटल मुंबई आणि मैक्स हॉस्पिटल नागपूर, यांनी सांगितले की, “हे प्रकरण जिवंत दात्याकडून करण्यात येणाऱ्या यकृत प्रत्यारोपणाचे जीवन वाचवण्याचे महत्त्व आणि रोबोटिक शस्त्रक्रियेचे फायदे दाखवते. रोबोटिक पद्धतीने दात्याच्या यकृताचा भाग काढल्यामुळे दात्याला कमी त्रास होतो आणि तो लवकर बरा होतो, तसेच उपचारांचे परिणामही चांगले मिळतात. या यशस्वी प्रत्यारोपणामुळे आधुनिक तंत्रज्ञान, विविध तज्ज्ञ डॉक्टरांचे समन्वयित कौशल्य आणि योग्य रुग्ण निवडीचे महत्त्व पुन्हा एकदा स्पष्ट होते.”

ही शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली आणि दान केलेला यकृताचा भाग रुग्णाच्या शरीरात व्यवस्थित कार्य करू लागला. यकृतदान करणारी अन्विता शस्त्रक्रियेनंतर चांगली बरी झाली आणि तिला अवघ्या सहा दिवसांत रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. तर तिचे वडील श्री. अनंत मून यांना 13 दिवसांनी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.

डॉ. राजविलास नारखेडे,डायरेक्टर – जीआय सर्जरी आणि लिव्हर ट्रान्सप्लांट, मैक्स हॉस्पिटल, नागपुर, यांनी सांगितले की,“रुग्णाला गंभीर यकृताचा आजार होता आणि त्याला तातडीने यकृत प्रत्यारोपणाची गरज होती. काळजीपूर्वक नियोजन, यकृतदात्याची सखोल तपासणी आणि डॉक्टरांच्या समन्वयित टीमवर्कमुळे आम्ही ही शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडू शकलो. अंतिम टप्प्यातील यकृताच्या आजाराने ग्रस्त रुग्णांसाठी जिवंत दात्याकडून होणारे लिव्हर प्रत्यारोपण हा अत्यंत महत्त्वाचा उपचार पर्याय आहे, विशेषतः अशा देशात जिथे मृत व्यक्तींकडून मिळणाऱ्या अवयवांची कमतरता आहे.”

या प्रकरणावर बोलताना डॉ. अमित गुल्हाने, असोसिएट डायरेक्टर – गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी आणि ट्रान्सप्लांट हेपॅटोलॉजी, मैक्स हॉस्पिटल, नागपुर, म्हणाले,“फादर्स डेच्या आधी झालेले हे यशस्वी यकृत प्रत्यारोपण अवयवदानामुळे कुटुंबाच्या आयुष्यात किती मोठा सकारात्मक बदल घडू शकतो, याची जाणीव करून देते. वडील आणि मुलगी दोघेही आता हळूहळू बरे होत आहेत. हा प्रसंग योग्य वेळी घेतलेला निर्णय, वैद्यकीय क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान, तज्ज्ञ डॉक्टरांचे कौशल्य आणि रुग्णांच्या दृढ इच्छाशक्तीची सांगड घातल्यास किती चांगले परिणाम साध्य होऊ शकतात, हे या प्रकरणातून दिसून येते." 

या यशस्वी शस्त्रक्रियेमुळे मैक्स हॉस्पिटल, नागपुर हे मध्य भारतातील यकृत प्रत्यारोपणआणि मल्टी-ऑर्गन प्रत्यारोपण सेवांसाठी एक अग्रगण्य केंद्र म्हणून अधिक मजबूत झाले आहे. अनुभवी तज्ज्ञ डॉक्टरांची टीम, अत्याधुनिक रोबोटिक तंत्रज्ञान आणि सर्वसमावेशक रुग्णसेवा यांच्या मदतीने हे हॉस्पिटल रुग्णांना जागतिक दर्जाचे उपचार त्यांच्या घराजवळच उपलब्ध करून देत आहे.

Post a Comment

0 Comments