Business

Header Ads

पर्नोड रिकार्ड इंडियाचा रॉयल स्टॅग 2025 मध्ये जगातील सर्वाधिक विकला जाणारा व्हिस्की ब्रँड ठरला

नवी दिल्ली : पर्नोड रिकार्ड इंडियाने जाहीर केले आहे की, IWSR 2025 च्या ताज्या क्रमवारीनुसार रॉयल स्टॅग हा 2025 मध्ये जगातील सर्वाधिक विकला जाणारा व्हिस्की ब्रँड ठरला आहे. 2025 मध्ये या ब्रँडची 3.26 कोटी (32.6 दशलक्ष) केसेस इतकी वार्षिक विक्री झाली. ही रॉयल स्टॅगसाठी मोठी कामगिरी आहे.

पर्नोड रिकार्ड इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) जीन टुबूल म्हणाले, "IWSR 2025 च्या क्रमवारीनुसार रॉयल स्टॅग हा जगातील सर्वाधिक विकला जाणारा व्हिस्की ब्रँड ठरणे ही पर्नोड रिकार्ड इंडियासाठी अभिमानाची बाब आहे. मात्र, या यशामागचे खरे कारण म्हणजे गेल्या तीन दशकांपासून आमच्या ग्राहकांनी आमच्यावर दाखवलेला विश्वास आहे. जे ब्रँड काळानुसार ग्राहकांच्या बदलत्या आवडी समजून घेतात, आपली सांस्कृतिक ओळख जपतात आणि सातत्याने नवनवीन गोष्टी करण्याचा प्रयत्न करतात, ते केवळ टिकून राहत नाहीत, तर जागतिक स्तरावर नेतृत्वही करतात. रॉयल स्टॅगचा प्रवास हे त्याचे उत्तम उदाहरण आहे."

1995–2010 : नवीन व्हिस्की श्रेणीची सुरुवात

भारताच्या आर्थिक उदारीकरणानंतर रॉयल स्टॅगने ग्राहकांना ग्रेन व्हिस्कीची ओळख करून दिली. आकर्षक नवीन बाटल्यांची रचना, छेडछाड टाळण्यासाठी सुरक्षित झाकण आणि अशा अनेक नवकल्पनांमुळे ब्रँडने गुणवत्ता व विश्वासाला नेहमीच प्राधान्य दिले. "नो आर्टिफिशियल फ्लेवर्स" या मोहिमेद्वारे ग्राहकांना व्हिस्कीची खरी चव समजावून सांगण्याचा प्रयत्न करण्यात आला. या यशस्वी वाटचालीत ब्रँडने 1 कोटी (10 दशलक्ष) केसेस विक्रीचा टप्पाही पार केला. 

2011–2020 : व्हिस्की श्रेणीत अग्रणी बनण्याचा प्रवास

ग्रेन व्हिस्कीची ओळख करून दिल्यानंतर रॉयल स्टॅगने रॉयल स्टॅग बॅरल सिलेक्ट बाजारात सादर करून आपल्या उत्पादनांमध्ये नवे बदल सुरूच ठेवले. यामुळे ब्रँडला अधिक प्रीमियम ओळख मिळाली आणि दर्जेदार उत्पादनाला प्राधान्य देणाऱ्या ग्राहकांचा विश्वासही कायम राहिला. त्यानंतर रॉयल स्टॅगने 1.85 कोटी (18.5 दशलक्ष) केसेस विक्रीचा टप्पा पार करत भारतातील आघाडीचा व्हिस्की ब्रँड म्हणून आपले स्थान अधिक मजबूत केले.

2021–2026 : भारतातील आघाडीच्या ब्रँडपासून जगातील सर्वात मोठ्या व्हिस्की ब्रँडकडे वाटचाल

भारत जागतिक स्तरावर अधिक प्रभावी देश म्हणून उदयास येत असताना रॉयल स्टॅगनेही आपला विस्तार केला आणि आज हा ब्रँड 33 देशांमध्ये उपलब्ध आहे. या काळात ब्रँडने "मार्क ऑफ प्युरिटी" ही संकल्पना सादर केली. यामध्ये कठोर गुणवत्ता तपासणी, ट्रिपल-बॅरल मॅच्युरेशन, अस्सल ब्लेंडिंग आणि "नो आर्टिफिशियल फ्लेवर्स" या दीर्घकालीन वचनबद्धतेचा समावेश आहे. याशिवाय, ब्रँडने आपल्या स्टॅग ब्रँडची ओळख अधिक आधुनिक केली, डबल टॅम्पर-एव्हिडंट टेक्नॉलॉजी (DTET) असलेली सुरक्षित झाकणे सादर केली आणि रॉयल स्टॅग डबल डार्क हे नवे उत्पादन बाजारात आणले. या उत्पादनामुळे व्हिस्कीच्या या श्रेणीत ग्राहकांना वेगळ्या चवीचा अनुभव देणारा नवा पर्याय उपलब्ध झाला.

या यशाबद्दल बोलताना पर्नोड रिकार्ड इंडियाच्या चीफ मार्केटिंग ऑफिसर (सीएमओ) देबाश्री दासगुप्ता म्हणाल्या," प्रतिष्ठित आणि लोकप्रिय ब्रँड फक्त बोर्डरूममध्ये तयार होत नाहीत, तर ते संस्कृतीशी जोडले जातात आणि प्रत्येक ग्राहकाचा विश्वास जिंकत उभे राहतात. रॉयल स्टॅग आज जगातील सर्वाधिक विकला जाणारा व्हिस्की ब्रँड बनला आहे, हे केवळ विक्रीचे यश नाही. गेल्या 30 वर्षांपासून ग्राहकांच्या बदलत्या अपेक्षांनुसार सातत्याने स्वतःला विकसित करत राहणे आणि त्यांच्या आयुष्याचा एक भाग बनण्याचा विश्वास संपादन करणे, हेच या यशामागील खरे कारण आहे. आम्ही कधीही या श्रेणीचा फक्त पाठपुरावा केला नाही, तर तो घडवण्याचा प्रयत्न केला आहे." 

रॉयल स्टॅगच्या सातत्यपूर्ण यशामागे ग्राहकांच्या आवडीनिवडींची सखोल समज आणि सततची नावीन्यपूर्णता ही प्रमुख कारणे आहेत. गेल्या काही वर्षांत या ब्रँडने क्रिकेट, संगीत आणि युवा संस्कृती यांच्याशी जोडलेले अनेक प्रभावी उपक्रम राबवले आहेत. त्यामध्ये रॉयल स्टॅग बूमबॉक्स हा प्रमुख उपक्रम तसेच ICC T20 विश्वचषकाशी असलेली भागीदारी यांचा समावेश आहे. याचबरोबर रॉयल स्टॅग बॅरल सिलेक्ट आणि रॉयल स्टॅग डबल डार्क यांसारख्या नव्या उत्पादनांद्वारे ब्रँडने आपल्या प्रीमियम उत्पादनांच्या श्रेणीचा सातत्याने विस्तार केला आहे. हा महत्त्वाचा टप्पा पर्नोड रिकार्ड इंडियाच्या भारतातून जागतिक स्तरावर ओळख निर्माण करणारे, व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी आणि सांस्कृतिकदृष्ट्या प्रभावी ब्रँड उभारण्याच्या उद्दिष्टाला आणखी बळकटी देणारा ठरला आहे.

Post a Comment

0 Comments