Business

Header Ads

फीफा विश्वचषक अंतिम सामन्याचा थरार अनुभवा आता एअरटेल वाय-फाय + टीव्हीसोबत; पात्र ग्राहकांना फक्त 24 रुपयांमध्ये सामना पाहण्याची संधी

राष्ट्रीय : फिफा विश्वचषकाचा अंतिम सामना आता अगदी जवळ आला असून, देशभरातील देशभरातील फुटबॉल चाहते या मोठ्या सामन्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. याच पार्श्वभूमीवर एअरटेलने आपल्या वाय-फाय + टीव्ही (आयपीटीव्ही आणि डीटीएच) ग्राहकांना सामना पाहण्यासाठी एक सोपा आणि परवडणारा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. 

कंपनीच्या माहितीनुसार, पात्र ग्राहक त्यांच्या सध्याच्या प्लॅनमधूनच फीफा विश्वचषक अंतिम सामन्याचा आनंद घेऊ शकतात किंवा फक्त 24 रुपये प्रति महिना देऊन युनाईट8 स्पोर्ट्स चॅनेल सुरू करू शकतात आणि हिंदी आणि इंग्रजी दोन्ही भाषांमध्ये थेट सामना पाहू शकतात.

एअरटेलने ग्राहकांना आवाहन केले आहे की, वेगळे स्ट्रीमिंग किंवा टीव्ही सबस्क्रिप्शन घेण्यापूर्वी एअरटेल अॅपवर जाऊन आपल्या सध्याच्या वाय-फाय + टीव्ही प्लॅनमध्ये कोणते फायदे मिळतात, ते तपासून पाहावेत. कंपनीचे 599 रुपये प्रति महिना पासून सुरू होणारे प्लॅन हाय-स्पीड फायबर ब्रॉडबँड, आयपीटीव्ही, ओटीटी अॅप्सचा प्रवेश आणि एअरटेल अॅपद्वारे सर्व सेवा एकाच ठिकाणी व्यवस्थापित करण्याची सुविधा देतात. त्यामुळे ग्राहकांना क्रीडा स्पर्धांसोबतच विविध मनोरंजनाचाही आनंद घेता येतो.

Post a Comment

0 Comments