थोडक्यात पण महत्त्वाचे
नितीन गडकरी आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत बजाज समूहाच्या शंभर वर्षांच्या उद्योग, समाजसेवा आणि सामाजिक परिवर्तनाच्या योगदानाचा गौरव करण्यात आला.
नवी दिल्ली, 7 जुलै 2026 : नवी दिल्ली येथील हयात रीजेन्सीमध्ये आयोजित भव्य समारंभात नवभारततर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या प्रतिष्ठित कॉफी टेबल पुस्तकाचे प्रकाशन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री श्री. नितीन गडकरी, वरिष्ठ कॅबिनेट मंत्री, धोरणकर्ते, उद्योग क्षेत्रातील मान्यवर आणि देशभरातील प्रतिष्ठित पाहुण्यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
या विशेष आवृत्तीत बजाज समूहाचे चेअरमन एमेरिटस आणि बजाज फाउंडेशनचे अध्यक्ष श्री. शिशिर बजाज यांच्यावर आठ पानांचे विशेष लेख प्रकाशित करण्यात आले आहेत. या लेखामध्ये स्वातंत्र्यसैनिक, समाजसेवक, उद्योगक्षेत्रातील अग्रणी आणि महात्मा गांधींचे दत्तक पाचवे पुत्र म्हणून ओळखले जाणारे संस्थापक श्री. जमनालाल बजाज यांच्या विचारांचा आणि कार्याचा वारसा पुढे नेण्यात श्री. शिशिर बजाज यांनी दिलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाचा आढावा घेण्यात आला आहे.
या कार्यक्रमात श्री. शिशिर बजाज यांचा भारतीय उद्योगक्षेत्रातील, विशेषतः साखर आणि इथेनॉल क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल तसेच ग्रामीण विकास आणि सामाजिक परिवर्तनासाठी आयुष्यभर केलेल्या कार्याबद्दल सन्मान करण्यात आला. देशाच्या विकासात, उद्योग उभारणीत आणि समाजसेवेत 100 वर्षांपासून मोलाचे योगदान देणाऱ्या बजाज कुटुंबाला हा सन्मान एका विशेष आणि ऐतिहासिक क्षणी मिळाला आहे
राष्ट्र प्रथम, आत्मनिर्भरता आणि सामाजिक जबाबदारी या मूल्यांवर उभारलेला बजाज समूहाचा वारसा काळानुसार भारताच्या गरजांनुसार सतत विकसित होत गेला आहे. श्री जमनालाल बजाज यांनी स्वातंत्र्य चळवळीत महत्त्वाचे योगदान देत स्वदेशी उद्योगांची पायाभरणी केली. त्यानंतरच्या पिढ्यांनी त्यांच्या विचारांना पुढे नेत देशाच्या आर्थिक आणि सामाजिक विकासासाठी अनेक महत्त्वपूर्ण संस्था उभारल्या.
श्री शिशिर बजाज यांच्या नेतृत्वाखाली बजाज हिंदुस्थान शुगर लिमिटेड ही भारतातील सर्वात मोठ्या एकात्मिक साखर आणि इथेनॉल उत्पादक कंपन्यांपैकी एक बनली. जैवइंधन क्षेत्राला चालना देणे आणि देशाच्या ऊर्जा सुरक्षिततेला बळकटी देण्यात कंपनीने महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्या कार्यकाळात कंपनीचा विस्तार दोन साखर कारखान्यांवरून चौदा साखर कारखान्यांपर्यंत आणि एका डिस्टिलरीवरून सहा डिस्टिलरीपर्यंत झाला. त्यामुळे कंपनी भारतातील साखर आणि इथेनॉल उद्योगातील अग्रगण्य कंपनी म्हणून ओळखली जाऊ लागली.
श्री. शिशिर बजाज यांनी साखर आणि ग्राहक उत्पादनांबरोबरच ऊर्जा क्षेत्रातही बजाज समूहाचा विस्तार करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. आज त्यांचे पुत्र आणि समूहाचे अध्यक्ष श्री. कुशाग्र बजाज यांच्या नेतृत्वाखाली साखर, इथेनॉल, ग्राहक उत्पादने आणि वीज निर्मिती या क्षेत्रांमध्ये समूहाची वाटचाल अधिक मजबूतपणे सुरू आहे.
बजाज एनर्जी लिमिटेड आणि ललितपूर पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून बजाज समूहाने भारताच्या ऊर्जा क्षेत्रात मजबूत स्थान निर्माण केले आहे. तसेच उत्तर प्रदेशच्या वीज गरजा पूर्ण करण्यातही समूहाचे महत्त्वाचे योगदान आहे. देशाची दीर्घकालीन ऊर्जा सुरक्षितता अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने समूह कार्यक्षम वीज निर्मितीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा सातत्याने शोध घेत आहे. यातून शाश्वत आणि धोरणात्मक ऊर्जा उपायांद्वारे देशाच्या भविष्यात योगदान देण्याचा त्यांचा दृष्टिकोन दिसून येतो.
या कॉफी टेबल पुस्तकामध्ये श्री. शिशिर बजाज यांच्या मार्गदर्शनाखाली बजाज फाउंडेशन आणि संबंधित ट्रस्ट यांनी केलेल्या सामाजिक कार्याचाही विशेष उल्लेख करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील वर्धा, राजस्थानातील सीकर आणि उत्तर प्रदेशातील ललितपूर येथे पाणी संवर्धन, नदी पुनरुज्जीवन, नैसर्गिक शेती, महिला सक्षमीकरण, अक्षय ऊर्जा, कौशल्य विकास आणि ग्रामीण उपजीविका यांसारख्या राबविण्यात आलेल्या उपक्रमांमुळे 2000 हून अधिक गावांतील 22 लाखांपेक्षा जास्त नागरिकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्यात आला आहे.
या लेखामध्ये श्री. शिशिर बजाज यांचे धाकटे पुत्र श्री. अपूर्व नयन बजाज यांच्या कार्याचाही उल्लेख करण्यात आला आहे. त्यांनी विविध तळागाळातील विकास उपक्रमांद्वारे बजाज कुटुंबाच्या समाजसेवेची परंपरा पुढे नेण्याचे काम केले आहे. तसेच बजाज कुटुंबाच्या पाचव्या पिढीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या कु. आनंदमयी बजाज यांनी नुकतीच समूहात जनरल मॅनेजर – ग्रुप स्ट्रॅटेजी म्हणून जबाबदारी स्वीकारली असून, जबाबदार नेतृत्वाची शंभर वर्षांची परंपरा पुढे नेण्याची भूमिका त्या पार पाडत आहेत.
अलीकडेच श्री. शिशिर बजाज यांना उद्योग, ग्रामीण विकास आणि सामाजिक-आर्थिक परिवर्तनातील उल्लेखनीय योगदानाबद्दल महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या हस्ते प्रतिष्ठेचा 'सर्वोत्तम नागरिक सन्मान' प्रदान करण्यात आला.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी बजाज कुटुंबाने उद्योग क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी आणि समाजसेवा यांचा उत्तम समन्वय साधत देशासाठी दिलेल्या योगदानाचे कौतुक केले. त्यामुळे बजाज कुटुंब हे भारतातील सर्वाधिक आदरणीय उद्योग घराण्यांपैकी एक म्हणून ओळखले जाते.
विकसित भारत 2047 या संकल्पनेकडे देश वाटचाल करत असताना, श्री शिशिर बजाज आणि बजाज कुटुंबाची प्रेरणादायी वाटचाल उद्योग, सामाजिक जबाबदारी आणि राष्ट्रहित यांचा समन्वय साधून दीर्घकालीन सकारात्मक बदल कसा घडवता येतो, याचे उत्तम उदाहरण ठरत आहे.
श्री शिशिर बजाज आणि बजाज कुटुंबावरील संपूर्ण 8 पान विशेष लेख वाचण्यासाठी:
पीडीएफ लिंक:
https://bajajgroup.org/bajajgroup_assets/s3fs-public/documents/Navabharat_Articles.pdf

0 Comments