Business

Header Ads

हेटिचचे नागपुर मध्ये नवीन 'हेटिच एक्सक्लुझिव्ह (HeX)' स्टोअर सुरू; आधुनिक इंटिरिअरचा खास अनुभव आता शहरात !

नागपूर, 22 जुलै 2026 : हेटिचने भारतातील आपल्या अनुभवाधारित रिटेल नेटवर्कला आणखी मजबूत करण्याच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकत नागपूरमध्ये नवीन हेटिच एक्सक्लुझिव्ह (HeX) स्टोअर सुरू केले आहे. हे स्टोअर देशभरात वेगाने वाढत असलेल्या हेटिचच्या HeX स्टोअर्स नेटवर्कचा एक महत्त्वाचा भाग आहे. या नव्या स्टोअरमध्ये ग्राहकांना जर्मन तंत्रज्ञानाने तयार केलेल्या उत्कृष्ट फर्निचर फिटिंग्स आणि आधुनिक इंटिरियर सोल्यूशन्स एकाच ठिकाणी प्रत्यक्ष पाहण्याची आणि अनुभवण्याची संधी मिळणार आहे. 

नागपूरमधील हेटीच एक्सक्लुझिव्ह (HeX) स्टोअरमध्ये ग्राहकांना संपूर्ण खरेदीचा अनुभव एकाच ठिकाणी मिळतो. येथे आधुनिक फर्निचर, प्रगत फर्निचर फिटिंग्ज, आर्किटेक्चरल डोअर हार्डवेअर, फर्निचर लाइटिंग आणि बिल्ट-इन किचन अप्लायन्सेस यांची विस्तृत श्रेणी आकर्षक पद्धतीने मांडण्यात आली आहे. ग्राहकांचा अनुभव अधिक सोपा आणि समाधानकारक करण्यासाठी हेटिचकडून मोफत डिझाइन सेवेचीही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या सेवेमध्ये कंपनीचे तज्ज्ञ ग्राहकांच्या गरजेनुसार फर्निचरचे डिझाइन आणि त्याचे नियोजन करण्यास मदत करतात. सुरुवातीच्या कल्पनेपासून ते काम पूर्ण होईपर्यंत संपूर्ण प्रक्रियेत ग्राहकांना योग्य मार्गदर्शन दिले जाते.

याबाबत हेटिच इंडियाचे सेल्स डायरेक्टर राहुल ठक्कर म्हणाले, "नागपूरमध्ये आधुनिक आणि नियोजनबद्ध घरांची मागणी वेगाने वाढत आहे. आजचे ग्राहक असे फर्निचर सोल्यूशन्स शोधत आहेत, जे आकर्षक, टिकाऊ आणि स्मार्ट असतील. आमच्या नवीन हेटीच एक्सक्लुझिव्ह (HeX) स्टोअरच्या माध्यमातून आम्ही आमचे पुरस्कारप्राप्त जर्मन तंत्रज्ञानावर आधारित उत्पादने थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवत आहोत. या स्टोअरमध्ये ग्राहकांना आमच्या विचारपूर्वक तयार केलेल्या इंटिरिअर सोल्यूशन्सचा प्रत्यक्ष अनुभव घेता येईल, त्यांची माहिती मिळवता येईल आणि आपल्या गरजेनुसार योग्य उत्पादनांची निवड करून खरेदी करता येईल."

नागपूरमधील हेटिच एक्सक्लुझिव्ह (HeX) स्टोअर हे यावर्षी देशभरात हेटिचच्या HeX स्टोअर्सचे नेटवर्क वाढवण्याच्या योजनेचा एक भाग आहे. हेटिचच्या एक्सपीरियन्स सेंटर्ससोबत हे स्टोअरही ग्राहकांना उत्पादने प्रत्यक्ष पाहण्याची, अनुभवण्याची आणि योग्य पर्याय निवडण्याची सुविधा देईल. हेटिचची सर्व उत्पादने स्मार्ट वापर, मजबूत गुणवत्ता आणि आकर्षक डिझाइन लक्षात घेऊन तयार करण्यात आली आहेत. त्यामुळे ती आधुनिक घरांच्या आणि बदलत्या जीवनशैलीच्या गरजा पूर्ण करण्यासाठी उपयुक्त ठरतात.

HeX नागपूरचा पत्ता : क्रिस्टल फर्निटेक, प्लॉट क्रमांक 12, बैद्यनाथ चौक, ग्रेट नाग रोड, नागपूर – 440026, महाराष्ट्र. संपर्क: 9922917765.

Post a Comment

0 Comments