थोडक्यात पण महत्त्वाचे
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नागपूरमधील मान्यवरांच्या उपस्थितीत न्यूएरा हॉस्पिटल्सने मध्य भारतातील आरोग्यसेवा अधिक सक्षम करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल उचलले.
नागपूर, महाराष्ट्र | 23 ऑक्टोबर 2026 : 2016 मध्ये 50 बेडच्या रुग्णालयापासून सुरू झालेला न्यूएरा हॉस्पिटल्सचा प्रवास आज अनेक ठिकाणी सेवा देणाऱ्या आरोग्यसेवा समूहापर्यंत पोहोचला आहे. सर्वसामान्यांना सहज उपलब्ध होणारी, आधुनिक आणि रुग्णांच्या गरजांना प्राधान्य देणारी आरोग्यसेवा देण्याचे ध्येय ठेवून रुग्णालयाने सातत्याने प्रगती केली आहे. याच प्रवासातील आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठत, न्यूएरा हॉस्पिटल्सने 23 ऑक्टोबर 2026 रोजी नागपूरमधील वर्धमान नगर येथे 300 बेडच्या अत्याधुनिक नवीन रुग्णालयाचे उद्घाटन केले. महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत या रुग्णालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी नागपूरमधील अनेक मान्यवर व्यक्ती, वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ, प्रतिष्ठित नागरिक आणि इतर सन्माननीय पाहुणे या कार्यक्रमाला उपस्थित होते.
या नवीन मुख्य रुग्णालयामुळे केवळ आरोग्य सुविधांमध्ये वाढ झाली आहे असे नाही, तर न्यूएरा हॉस्पिटल्सच्या प्रगतीतील एक नवा टप्पा आहे. वैद्यकीय क्षेत्रात नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करणे आणि नागपूर, विदर्भ तसेच मध्य भारतातील रुग्णांना विशेष व आधुनिक आरोग्यसेवा उपलब्ध करून देणे, हा यामागील मुख्य उद्देश आहे. गेल्या अनेक वर्षांपासून न्यूएरा हॉस्पिटल्सने वैद्यकीय तज्ज्ञांचे ज्ञान, आधुनिक तंत्रज्ञान आणि रुग्णांची प्रेमाने व काळजीपूर्वक सेवा यांचा समन्वय साधणारी आरोग्यव्यवस्था उभारण्यावर भर दिला आहे. वर्धमान नगर येथील हे नवीन रुग्णालय या प्रवासातील एक एक नवे पर्व आहे. येथे प्रगत रोबोटिक शस्त्रक्रिया, अत्याधुनिक निदान सुविधा, कृत्रिम बुद्धिमत्तेवर (AI) आधारित रुग्णांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवणारी यंत्रणा आणि विविध विशेष वैद्यकीय सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध असतील.
या नवीन रुग्णालयाचे एक प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे येथे उपलब्ध असलेली प्रगत रोबोटिक शस्त्रक्रिया सुविधा. यामध्ये सिंगल-पोर्ट आणि मल्टी-पोर्ट रोबोटिक शस्त्रक्रिया प्रणालींचा समावेश आहे. रुग्णालयाने दिलेल्या माहितीनुसार, येथे भारतातील पहिले सिंगल-पोर्ट सर्जिकल रोबोट सुरू करण्यात येणार आहे. या सोबतच कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित पूर्णपणे डिजिटल 3T एमआरआय मशीन, 256-स्लाइस सीटी स्कॅनर आणि होलॉजिक 3D मॅमोग्राफी यांसारख्या अत्याधुनिक निदान सुविधाही येथे उपलब्ध असतील. याशिवाय, ऑपरेशन थिएटर आणि अतिदक्षता विभागात (ICU) एआय आधारित रुग्णांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवणारी यंत्रणा असेल. तसेच रोबोटिक फिजिओथेरपी आणि आधुनिक पुनर्वसन सेवांचाही या रुग्णालयात समावेश करण्यात येणार आहे.
या सर्व सुविधांमधून रुग्णाच्या आजाराचे निदान करण्यापासून ते उपचार आणि पूर्णपणे बरे होण्यापर्यंतच्या प्रत्येक टप्प्यावर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर न्यूएरा हॉस्पिटल्सचा भर दिसून येतो. यासोबतच या वैद्यकीय तज्ज्ञांचे कौशल्य, रुग्णांची सुरक्षितता आणि प्रत्येक रुग्णाच्या गरजेनुसार वैयक्तिक उपचार यांना प्राधान्य दिले जाते. रुग्णांसोबत येणाऱ्या नातेवाइकांची आणि काळजीवाहू व्यक्तींचीही योग्य काळजी घेण्यावर रुग्णालयाने भर दिला आहे. त्यांच्यासाठी घरासारखे आरामदायी वातावरण, उत्तम दर्जाचे जेवण आणि आरामदायी निवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
या प्रसंगी न्यूएरा हॉस्पिटल्सचे व्यवस्थापकीय संचालक आणि सह-संस्थापक डॉ. आनंद संचेती म्हणाले, “न्यूएरा हॉस्पिटल्सच्या प्रवासातील प्रत्येक महत्त्वाचा टप्पा हा आम्ही सेवा देत असलेल्या समाजाला दर्जेदार आरोग्यसेवा अधिक सहज उपलब्ध करून देण्याच्या ध्येयातून साकार झाला आहे. आमच्या पहिल्या रुग्णालयापासून ते वर्धमान नगर येथील 300 बेडच्या या भव्य रुग्णालयापर्यंतचा प्रवास हा सातत्याने प्रगती करण्याची, नवनवीन तंत्रज्ञान स्वीकारण्याची आणि रुग्णांच्या आरोग्याची काळजी घेण्याची आमची बांधिलकी दर्शवतो. हे नवीन रुग्णालय मध्य भारतातील रुग्णांना त्यांच्या जवळच अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे. यापुढेही आधुनिक तंत्रज्ञान, वैद्यकीय तज्ज्ञांचे कौशल्य आणि रुग्णांप्रती आपुलकीपूर्ण यांचा योग्य समन्वय साधण्यावर आमचा भर राहील.”
न्यूएरा हॉस्पिटल्सचे संचालक आणि सह-संस्थापक डॉ. निलेश अग्रवाल म्हणाले, “वर्धमान नगर येथील हे नवीन रुग्णालय या भागात प्रगत वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्याच्या आमच्या प्रयत्नांना नवी दिशा देणारे आहे. अत्याधुनिक रोबोटिक शस्त्रक्रिया प्रणाली, नवीन पिढीतील निदान तंत्रज्ञान आणि विविध विशेष वैद्यकीय सेवांच्या माध्यमातून रुग्णांना त्यांच्या जवळच अधिक चांगले उपचार उपलब्ध करून देण्याच्या संधी आम्ही वाढवत आहोत. वैद्यकीय क्षेत्रातील प्रगतीसोबत पुढे जाणे, हे आमच्या प्रवासाचे नेहमीच महत्त्वाचे वैशिष्ट्य राहिले आहे. मात्र, या सर्व प्रगतीसोबत रुग्णांची सुरक्षितता, योग्य वैद्यकीय निर्णय आणि रुग्णांच्या गरजेनुसार योग्य उपचार यांनाच आम्ही सर्वोच्च प्राधान्य देत राहू.”
न्यूएरा हॉस्पिटल्सचे संचालक आणि सह-संस्थापक डॉ. निधीश मिश्रा पुढे म्हणाले, “न्यूएरा हॉस्पिटल्सचा विस्तार होत असताना, अनुभवी आणि नामांकित डॉक्टर, अत्याधुनिक निदान सुविधा आणि योग्य वेळी उपचार या माध्यमातून सर्वसमावेशक आरोग्यसेवा अधिक मजबूत करण्याचा आमचा प्रयत्न आहे. या नवीन रुग्णालयात विविध वैद्यकीय शाखांमध्ये योग्य उपचारांचे निर्णय घेण्यासाठी आवश्यक असलेल्या सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या मध्ये हृदयविकारावरील उपचारांचाही समावेश आहे. या आधुनिक सुविधांचा लाभ परिसरातील अधिकाधिक रुग्णांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.”
वर्धमान नगर येथील या नवीन रुग्णालयाचे उद्घाटन हा न्यूएरा हॉस्पिटल्सच्या विकासप्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. एका रुग्णालयापासून सुरुवात करून न्यूएरा हॉस्पिटल्सने आपल्या रुग्णालयांच्या नेटवर्कचा कसा विस्तार केला आहे, हे यातून दिसून येते. येथे विविध तज्ज्ञ वैद्यकीय सेवा आणि आधुनिक उपचार सुविधाही उपलब्ध आहेत. न्यूएरा हॉस्पिटल्स आपल्या विकासाच्या या नवीन टप्प्यात आरोग्य सेवा अधिक चांगल्या करण्यावर, वैद्यकीय क्षेत्रातील नवीन तंत्रज्ञानाचा जबाबदारीने वापर करण्यावर आणि रुग्णांना उत्तम अनुभव देण्यावर भर देत आहे. रुग्णांना विश्वास, वैद्यकीय तज्ज्ञांचे कौशल्य आणि संवेदनशीलतेसह उत्तम उपचार देणे हेच यामागील उद्दिष्ट आहे. 50 बेडच्या रुग्णालयापासून 300 बेडच्या रुग्णालयापर्यंतचा प्रवास करत न्यूएरा हॉस्पिटल्स मध्य भारतातील आरोग्यसेवा अधिक प्रगत करण्याच्या दिशेने सातत्याने वाटचाल करत आहे.
न्यूएरा हॉस्पिटल्स — उपचारांसोबत आरोग्यदायी जीवनाची हमी!

0 Comments