नागपूर, 21 ऑक्टोबर 2026 : इलेक्ट्रिक बसेस आणि हलक्या व्यावसायिक वाहनांच्या क्षेत्रातील जागतिक अग्रणी आणि हिंदुजा समूहाचा भाग असलेली स्विच मोबिलिटी लिमिटेड (SWITCH Mobility Ltd) आणि भारतातील प्रमुख आंतरशहरी प्रवासी सेवा पुरवठादारांपैकी एक असलेल्या पर्पल बस (PURPLE BUS) यांनी नागपूर-चंद्रपूर मार्गावर या भागातील पहिली इलेक्ट्रिक बस सेवा सुरू केली आहे. या उपक्रमामुळे पर्पल बसचे आंतरशहरी नेटवर्क विदर्भात अधिक विस्तारले आहे. भारत सरकारच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत, पर्पल बसद्वारे विदर्भात कार्यान्वित केल्या जाणाऱ्या 50 'EiV12m' आंतरशहरी इलेक्ट्रिक बसेसपैकी पहिल्या सहा बसेसना हिरवा झेंडा दाखवून या सेवेचा शुभारंभ करण्यात आला.
दसऱ्याच्या मुहूर्तावर हा शुभारंभ करण्यात आला, जो नवीन कार्याची सुरुवात करण्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो. हे स्विच मोबिलिटीची या प्रदेशात सुरक्षित, विश्वासार्ह आणि शाश्वत सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून देण्याप्रती असलेली निरंतर बांधिलकी दर्शवते. या नवीन मार्गामुळे दोन्ही शहरांमधील दळणवळण अधिक सुलभ होईल आणि प्रवाशांना एक सुरक्षित, आरामदायक तसेच पर्यावरणपूरक प्रवासाचा पर्याय उपलब्ध होईल.
स्विच मोबिलिटी (SWITCH Mobility) आणि प्रसन्ना पर्पल मोबिलिटी सोल्युशन्स (Prasanna Purple Mobility Solutions) यांच्यातील हा या वर्षातील तिसरा आंतरशहरी (intercity) उपक्रम आहे. याआधी एप्रिल 2026 मध्ये मुंबई-पुणे आणि ऑक्टोबर 2026 मध्ये डोंबिवली-पुणे अशा भारतातील अत्यंत वर्दळीच्या मार्गांवर इलेक्ट्रिक बसेसची सेवा सुरू करण्यात आली होती. वर्दळीच्या आंतरशहरी मार्गांसाठी इलेक्ट्रिक बसेसवर ऑपरेटर्सचा विश्वास वाढतो आहे, हेच ही निरंतर भागीदारी दर्शवते. तसेच, भारताच्या शाश्वत आंतरशहरी प्रवासाच्या दिशेने होणाऱ्या परिवर्तनात स्विच मोबिलिटीची भूमिका अधिक विस्तारत असल्याचेही यातून अधोरेखित होते.
या नवीन मार्गाच्या उद्घाटनाप्रसंगी स्विच मोबिलिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) गणेश मणी म्हणाले, "नागपूर आणि चंद्रपूर यांच्यात घनिष्ठ आर्थिक आणि सांस्कृतिक संबंध आहेत. आमचे भागीदार प्रसन्ना पर्पल मोबिलिटी सोल्युशन्ससोबत मिळून हे संबंध अधिक बळकट करणे, हे संपूर्ण भारतात भविष्यासाठी सज्ज सार्वजनिक वाहतूक व्यवस्था निर्माण करण्याच्या आमच्या ध्येयातील एक महत्त्वाचे पाऊल आहे. या वर्षाच्या सुरुवातीला मुंबई-पुणे मार्गावर सेवा सुरू केल्यानंतर, आता विदर्भातही ही भागीदारी विस्तारताना आम्हाला आनंद होत आहे. या भागातील लोकांच्या दैनंदिन प्रवासाला पाठबळ देऊन आम्ही त्यांच्या प्रगतीत योगदान देत आहोत. या उपक्रमाद्वारे, महाराष्ट्र आणि इतर ठिकाणी शाश्वत व लोककेंद्री (people-first) वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून देण्याच्या आमच्या वचनबद्धतेचा पुन्हा एकदा पुनरुच्चार झाला आहे."
पर्पल बसचे संचालक सौरभ पटवर्धन म्हणाले, “शहरांदरम्यान प्रवास करण्यासाठी इलेक्ट्रिक बस हा अपवाद न राहता, एक सर्वसामान्य मार्ग बनावा, हे आमचे ध्येय आहे. भारतातील सर्वात व्यस्त मार्गांपैकी एक असलेल्या मुंबई-पुणे पासून ते नागपूर-चंद्रपूर पर्यंत, टप्प्याटप्प्याने हे भविष्य आम्ही घडवत आहोत, त्यातूनच आम्ही आता विदर्भामध्ये पहिली इलेक्ट्रिक बस सेवा आणत आहोत. आमच्या ताफ्याने इलेक्ट्रिक आंतरशहरी सेवेमध्ये आधीच दहा लाख किलोमीटरपेक्षा जास्त अंतर कापले आहे आणि आकडेवारीने तेच सिद्ध केले आहे. नेमकं याबद्दलच अनेक ऑपरेटर्सना शंका होती.
डिझेलच्या तुलनेत इलेक्ट्रिक बसचा एकूण मालकी खर्च आणि प्रति प्रवासी-किलोमीटर खर्च कमी असतो. हे सिद्ध करण्यासाठी स्विच मोबिलिटीसोबतची आमची भागीदारी केंद्रस्थानी राहिली आहे आणि त्यामुळे आम्हाला संपूर्ण महाराष्ट्रात शाश्वत आंतरशहरी वाहतूक सेवा विस्तारण्याचा आत्मविश्वास मिळाला आहे.”
विदर्भातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट करणे
स्विच मोबिलिटीच्या प्रसन्न पर्पल मोबिलिटी सोल्युशन्ससोबतच्या वाढत्या भागीदारीत नागपूर-चंद्रपूर मार्ग भर घालतो आणि भारतातील शहरांमध्ये तसेच गावांमध्ये सुलभ, शून्य-उत्सर्जन सार्वजनिक वाहतूक सक्षम करण्याच्या कंपनीच्या व्यापक दृष्टिकोनाला बळकटी देतो. विदर्भ प्रदेशातील प्रमुख केंद्रांना जोडून, या उपक्रमामुळे दैनंदिन प्रवास सुलभ होईल, स्थानिक आर्थिक घडामोडींना चालना मिळेल आणि स्वच्छ आंतरशहरी वाहतुकीकडे होणाऱ्या बदलाला गती मिळेल अशी अपेक्षा आहे.
स्विच EiV12m आंतरशहरी कोचमध्ये कार्यक्षमता, परिणामकारकता आणि प्रवाशांचा आराम यांचा सुरेख मेळ असून, तो विशेषतः लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी तयार करण्यात आला आहे. यामध्ये 45 पुशबॅक आसने, एका चार्जवर 350 किमीची रेंज आणि फास्ट-चार्जिंगची सुविधा आहे, ज्यामुळे लांब पल्ल्याच्या आंतरशहरी प्रवासाचे संचालन कार्यक्षमतेने करणे शक्य होते. प्रगत सुरक्षा प्रणाली, शांत प्रवासाचा अनुभव आणि रिअल-टाइम मॉनिटरिंगसाठी स्विच आयऑन (SWITCH iON) कनेक्टेड तंत्रज्ञानासह, ही बस एक विश्वसनीय आणि आरामदायक आंतरशहरी प्रवासाचा अनुभव देण्यासाठी डिझाइन केला आहे.

0 Comments