नागपुर : नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत महायुतीचे अधिकृत उमेदवार, सुशिक्षित, सुसंस्कृत नेतृत्व, निष्ठावंत शिक्षक आणि सामाजिक कार्यकर्ते सुधाकर विठ्ठलराव कोहळे यांच्या प्रचार मोहिमेने वेग घेतला आहे. पदवीधरांचे विविध प्रश्न, बेरोजगारी आणि करिअरच्या संधींवर ठोस उपाय शोधत कोहळे यांनी आपला सर्वसमावेशक जाहीरनामा मतदारांसमोर ठेवला आहे.
जाहीरनाम्यातील प्रमुख मुद्दे
इंडस्ट्री-रेडी प्रशिक्षण : पदवीधरांना थेट बाजाराच्या गरजेनुसार आधुनिक व कौशल्यपूर्ण 'इंडस्ट्री-रेडी' प्रशिक्षण उपलब्ध करून दिले जाईल.
कॅम्पस ते कॉर्पोरेट जोडणी : शिक्षणातून थेट नोकरीच्या संधी मिळाव्यात यासाठी महाविद्यालयीन कॅम्पस आणि कॉर्पोरेट जगतात थेट समन्वय साधला जाणार आहे.
रोजगार व सेवांची उपलब्धता : ग्रामीण आणि दुर्गम भागातील पदवीधरांना प्राधान्य देत, तिथे रोजगाराच्या नवीन संधी निर्माण करणे आणि आवश्यक सेवा पोहोचवण्यावर विशेष भर असेल.
सुरक्षितता व सन्मान : पदवीधरांसाठी सन्मानपूर्वक, सुरक्षित आणि पोषक कार्य परिसराचे (वर्कप्लेस) नियोजन करण्यात येईल.
ग्रंथालये व लर्निंग सेंटर्स : पदवीधरांशी थेट संवादासाठी व्यासपीठ, अद्ययावत ग्रंथालये आणि डिजिटल लर्निंग सेंटर्स उभारली जातील.
स्टार्टअप व स्वयंरोजगार : तरुणाईच्या नवसंकल्पनांना बळ देण्यासाठी स्टार्टअप्स आणि स्वयंरोजगाराला मोठ्या प्रमाणावर आर्थिक व तांत्रिक प्रोत्साहन दिले जाणार आहे.
पदवीधरांच्या हक्काचा आवाज विधिमंडळात पोहोचवण्यासाठी सुधाकर विठ्ठलराव कोहळे यांना पहिल्या पसंतीचे मत देऊन प्रचंड बहुमताने विजयी करावे," असे आवाहन महायुतीच्या वतीने करण्यात आले आहे. सुशिक्षित, अनुभवी आणि जमिनीशी जोडलेल्या नेतृत्वाला मतदार कसा कौल देतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
जाहीरात

0 Comments