ऑक्टोबर २०२६ : एम्पीयरनेनागपूरमध्ये आपले रिटेल आणि सर्व्हिस नेटवर्क अधिक मजबूत करत पुराना बगडगंज येथे नित्यमएंटरप्रायझेस या नवीनस्टोअरचे उद्घाटन केले. एम्पीयरचे हे नवीन एक्सपीरियन्स सेंटर ग्राहकांना एकाचछताखाली विक्री आणि सर्व्हिसच्या सुविधा उपलब्ध करून देणार असून, परिसरातील ग्राहकांसाठी इलेक्ट्रिक मोबिलिटी अधिक सुलभ आणि सोयीस्कर बनवणार आहे. नवीन एक्सपीरियन्ससेंटरमध्ये एम्पीयरच्या इलेक्ट्रिक स्कूटर्सच्या संपूर्ण पोर्टफोलिओचे प्रदर्शनकरण्यात येणार आहे. ग्राहकांच्या विविध गरजा आणि वापर लक्षात घेऊन या स्कूटर्सचीरचना करण्यात आली आहे.
या पोर्टफोलिओमधील विशेष आकर्षण म्हणजे ५ किलोवॅटक्षमतेच्या नवीन दमदार मोटरसह सादर करण्यात आलेली एम्पीयर नेक्सस EX+ ही स्कूटर.भारतातील आव्हानात्मक मार्गांवर उत्कृष्ट कामगिरी करत या स्कूटरने अनेक राष्ट्रीयआणि आंतरराष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केले आहेत. कुटुंबांसाठी तसेचकिफायतशीर पर्यायांना प्राधान्य देणाऱ्या ग्राहकांसाठी एम्पीयरने मॅग्नस GMax सादर केलीआहे. दैनंदिन वापराच्या गरजा, कनेक्टेड तंत्रज्ञान आणि किफायतशीर किंमत यांचा उत्तम समतोलया स्कूटरमध्ये साधण्यात आला आहे.
मॅग्नस Neo ही स्कूटर दैनंदिन प्रवास अधिक आरामदायी करण्यासोबतच आकर्षकलूक लक्षात घेऊन विकसित करण्यात आली आहे. याशिवाय, तरुण रायडर्स, विशेषतः शाळा आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी अलीकडेचसादर करण्यात आलेली एम्पीयर Reo Vyb ही स्कूटरदेखील या पोर्टफोलिओमध्ये समाविष्ट आहे. एम्पीयर नेक्सस EX+ आणि मॅग्नस GMax यांची निवडकव्हेरिएंट्स इंटेलिपॅक तंत्रज्ञानाने सुसज्ज आहेत. यामध्ये ३० हून अधिक स्मार्टफीचर्स उपलब्ध असून, ग्राहकांना कनेक्टेड आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा अनुभव मिळतो.
या पोर्टफोलिओमध्ये पुढील पिढीचे LFP बॅटरी तंत्रज्ञान आणि पाच वर्षे किंवा ७५,०००किलोमीटरपर्यंतची स्टँडर्ड बॅटरी वॉरंटी देण्यात आली आहे. इलेक्ट्रिक मोबिलिटीअधिक विश्वासार्ह आणि सुलभ करण्याच्या एम्पीयरच्या वचनबद्धतेचे हे प्रतीक आहे. एम्पीयरचे ‘भारत कीस्मार्ट राइड’ हेसंकल्पनात्मक धोरण प्रत्यक्ष वापरातील अभियांत्रिकी अनुभव आणि भारतातील विविधप्रकारच्या रस्त्यांवर केलेल्या चाचण्यांवर आधारित आहे.
इंटेलिपॅक तंत्रज्ञानानेसुसज्ज असलेल्या मॅग्नस GMax ने अलीकडेच अल्टिमेट एन्ड्युरन्स राइड पूर्ण केली. या मोहिमेत अरुणाचल प्रदेशातील डोंगव्हॅलीपासून गुजरातमधील कच्छ येथील गुहार मोतीपर्यंतचा सुमारे ४,०००किलोमीटरचा प्रवास १५ दिवसांत पूर्ण करण्यात आला. या प्रवासात पर्वतीय प्रदेश, मैदाने आणिवाळवंटी भागांचा समावेश होता. एम्पीयरच्या नेक्सस प्लॅटफॉर्मने कोल्ली हिल्समधील ७०हेअरपिन वळणे पार करत तसेच भारतातील सर्वाधिक उंचीवरील मोटारवाहतुकीसाठी उपलब्धअसलेल्या मार्गांपैकी एक असलेल्या शिपकी ला पासवर (१३,२०० फूट) पोहोचून आपली क्षमता सिद्ध केली आहे.
भारतातीलविविध भौगोलिक आणि हवामानविषयक परिस्थितींमध्ये या वाहनांची कामगिरी यामोहिमांमधून अधोरेखित झाली आहे. आधुनिक आणि परस्परसंवादीरिटेल केंद्र म्हणून विकसित करण्यात आलेले एम्पीयरचे नवीन एक्सपीरियन्स सेंटरग्राहकांना कंपनीच्या उत्पादनांची माहिती घेण्याची, प्रशिक्षित प्रोडक्ट स्पेशालिस्ट्सशी संवाद साधण्याची आणिइलेक्ट्रिक मोबिलिटीचे फायदे समजून घेण्याची संधी देईल. आरामदायी वातावरणातग्राहकांना उत्पादनांची तुलना करून योग्य खरेदीचा निर्णय घेता येईल. ग्रीव्ह्ज इलेक्ट्रिकमोबिलिटीने प्रमुख बाजारपेठांमध्ये एम्पीयरचे रिटेल आणि सर्व्हिस नेटवर्कविस्तारण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून ही नवीन डीलरशिप सुरू केली आहे.
ग्राहकांना उत्पादने सहज उपलब्ध करून देणे आणि वाहनांच्या मालकीशी संबंधित आवश्यकसेवा व सहाय्य पुरवणे, हा या उपक्रमामागील उद्देश आहे.नागपूरमधील या नवीनएक्सपीरियन्स सेंटरच्या माध्यमातून स्थानिक ग्राहकांशी अधिक दृढ संबंध निर्माणकरण्यासोबतच इलेक्ट्रिक मोबिलिटीचा प्रसार आणि उपलब्धता वाढवण्याच्या दिशेनेएम्पीयरने आणखी एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.

0 Comments