Business

Header Ads

थंड राहा, निरोगी राहा: वोक्हार्ट हॉस्पिटल्सकडून स्मार्ट समर न्यूट्रिशन टिप्स !

 नागपुर : उन्हाळ्यात तापमान प्रचंड वाढत असताना, शरीरातील अतिरिक्त पाणी आणि आवश्यक इलेक्ट्रोलाईट्स घामावाटे बाहेर पडण्याची शक्यता असते. वोक्हार्ट हॉस्पिटल्समध्ये आम्ही सांगतो की, शरीरातील पाण्याचे प्रमाण (हायड्रेशन), ऊर्जा आणि एकूणच सुदृढ आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी, ऋतूनुसार आपल्या आहारात योग्य बदल करणे आवश्यक आहे.

उन्हाळ्यात निरोगी राहण्याचा सर्वात प्रभावी मार्गांपैकी एक म्हणजे, पाण्याचे प्रमाण जास्त असलेली फळे आणि भाज्यांचे सेवन वाढवणे. कलिंगड, खरबूज, आंबा आणि पपई यांसारखी फळे केवळ शरीरातील पाण्याचे प्रमाण (हायड्रेशन) टिकवून ठेवण्यासच मदत करत नाहीत, तर त्वरित ऊर्जा मिळण्यासाठी आवश्यक असलेली जीवनसत्त्वे, अँटिऑक्सिडंट्स आणि नैसर्गिक साखर देखील पुरवतात. 

भारतातील उन्हाळ्यातील पारंपरिक पेये देखील शरीरातील पाण्याचे प्रमाण आणि इलेक्ट्रोलाईट्सचा समतोल राखण्यातही महत्त्वाची भूमिका बजावतात. ताक (छास), नारळपाणी, आम पन्ना, लिंबूपाणी, जलजीरा आणि कोकम सरबत हे यासाठी उत्तम पर्याय आहेत. 

दह्यापासून बनलेले पदार्थ जसे की रायता, लस्सी आणि कढी शरीराचे तापमान ठंडे ठेवण्यास आणि पचनक्रिया सुधारण्यास मदत करतात.

स्वाती अवस्थी, चीफ डायटीशियन, वोक्हार्ट हॉस्पिटल्स, नागपूर सांगतात की उन्हाळ्यात हलका आणि सहज पचणारा आहार घेणे चांगले असते. जड, तेलकट आणि मसालेदार पदार्थ टाळा. संपूर्ण धान्य, डाळी, भाजीपाला आणि दही यांसह संतुलित जेवण निवडा.
शरीरात पाण्याचे प्रमाण योग्य ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. दररोज किमान 8 ते 10 ग्लास पाणी प्या.

आहारात काय सेवन करावे:

• भरपूर पाणी प्या 
• हंगामी फळे आणि भाज्या खा 
• प्रोबायोटिक अन्नपदार्थांचा आहारात समावेश करा 

आहारात काय टाळावे :
• तळलेले आणि मसालेदार पदार्थ टाळा 
• साखरयुक्त पेये कमी प्या 
• जेवणाच्या वेळाचुकवू नका 

स्वाती अवस्थी, चीफ डायटीशियन, वोक्हार्ट हॉस्पिटल्स, नागपूर यांचा सल्ला: “ऋतुमानानुसार मिळणारे पदार्थ केवळ शरीराला पोषण देत नाही, तर बदलत्या हवामानाशी नैसर्गिकरीत्या जुळवून घेण्यासही मदत करतात.”

Post a Comment

0 Comments