Business

Header Ads

इव्होनिथ स्टीलकडून २,००० कोटी रुपयांच्या भांडवल उभारणीची घोषणा; रिफायनान्सिंग आणि एनसीडी इश्यू प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण !

थोडक्यात पण महत्त्वाचे

• कर्जाचा खर्च कमी करण्यासाठी आणि डाउनस्ट्रीम विस्ताराला गती देण्यासाठी १,७५० कोटी रुपयांचे नवीन डेब्टच रिफायनान्सिंग आणि अतिरिक्त २५० कोटी रुपयांचे एनसीडी उभारले.
• क्रिसिलकडून 'एए-; स्टे बल' (AA-; STABLE) क्रेडिट रेटिंग कायम.

मुंबई, १६ एप्रिल २०२६ : इव्होनिथ स्टीलने आपल्या विद्यमान कर्जाचे रिफायनान्सय करण्यासाठी १,७५० कोटी रुपयांचे नवीन कर्ज उभारल्याची घोषणा केली आहे. या रिफायनान्सिंग प्रक्रियेचा उद्देश कर्जाचा खर्च कमी करणे, कर्जाचा कालावधी वाढवणे आणि विद्यमान, तसेच भविष्यातील विकास योजनांना पाठबळ देण्यासाठी आर्थिक स्थिरता वाढवून कंपनीची भांडवली रचना सुधारणे हा आहे. या व्यवहाराचे अंडररायटिंग व सिंडिकेशन स्टँडर्ड चार्टर्ड आणि जेपी मॉर्गन चेस बँक, एन. ए., मुंबई शाखा यांनी केले आहे.

तसेच, कंपनीने एचडीएफसी म्युच्युअल फंड कडून आणखी २५० कोटी रुपयांचे नॉन-कन्व्हर्टिबल डिबेंचर्स (एनसीडी) उभारले आहेत, ज्यामुळे उच्च् श्रेणीतील आर्थिक संस्थांमधील कंपनीची विविधता अधिक दृढ झाली आहे. जे.पी. मॉर्गन इंडिया प्रायव्हेट लिमिटेडने या एनसीडीसाठी स्ट्रक्चरिंग अॅडवायजर म्हणून काम पाहिले.
कंपनीने यापूर्वी क्रिसिल रेटिंग्जगकडून 'एए-; स्टेटबल' (AA-; STABLE) रेटिंग मिळवल्याचे जाहीर केले होते, ज्याची मार्च २०२६ मध्ये पुन्हाय पुष्टी करण्यात आली. या रेटिंगमधून इव्होनिथ स्टीलच्या पाठीशी असलेल्या घटकांमधील व्यवस्थापनाने केलेल्या सुधारणा दिसून येतात. ऑक्टोबर २०२४ मध्ये जाहीर केलेल्या कंपनीच्या मागील कर्जाची आता पूर्णपणे परतफेड करण्यात आली आहे.

डिसेंबर २०२० मध्ये हा व्यवसाय ताब्यात घेतल्यापासून इव्होनिथ स्टीलने महत्त्वपूर्ण कार्यात्मक सुधारणा सुनिश्चित केल्या आहेत. ज्यामुळे उत्पादनात वाढ, प्रकल्पांची यशस्वी पूर्तता आणि व्यवसायाची एकंदरीत कामगिरी व नफाक्षमतेत वाढ झाली आहे. परिणामी, कंपनी आता आपल्या विकासाच्या पुढील टप्प्यासाठी प्रबळपणे सज्ज झाली आहे.

या रिफायनान्सिंग प्रक्रियेबाबत मत व्यीक्त करत इव्होनिथ स्टीलचे अध्यक्ष जय सराफ म्हणाले, "आमची वित्तपुरवठा धोरणे आर्थिकदृष्ट्या स्थिर आणि विकासोन्मुख व्यवसाय उभारण्याच्या आमच्या दीर्घकालीन दृष्टीकोनाशी सुसंगत आहेत. भांडवलाचा खर्च कमी करून आणि कर्जाची मुदत वाढवून आम्ही कार्यात्मक उत्कृष्टता, तसेच आमच्या वर्तमान व भविष्यातील विस्तारासाठी गुंतवणूक करण्यास अधिक उत्तम स्थितीत आहोत. इव्होनिथ स्टीलमध्ये आमचे भविष्याभिमुख संस्थेच्या उभारणीवर लक्ष केंद्रित आहे, जी आमच्या सर्व भागधारकांसाठी मूल्य निर्माण करेल."

या फायनान्सिंगमधून कंपनीची उत्तम कामगिरी आणि कार्यक्षम ऑपरेशन्समुळे निर्माण झालेली मजबूत आर्थिक स्थिती दिसून येते, विशेषतः जागतिक भू-राजकीय वातावरणातील सध्याच्या अस्थिर काळात हे महत्त्वपूर्ण आहे. कंपनी आता व्हॅल्यू चेनमध्ये डाउनस्ट्रीम प्रक्रियेत अधिक प्रगती करण्यासाठी आणि एकूण उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी अनेक नवीन भांडवली खर्च उपक्रम हाती घेत आहे.
आपले मत व्यीक्त करत इव्होनिथ स्टीलचे संचालक राजिब गुहा म्हणाले, "या फायनान्सिंगमुळे आमचा वित्तपुरवठा खर्च लक्षणीयरित्या कमी झाला आहे. हे केवळ यशस्वी भांडवल वाटपामुळे शक्य झाले आहे, ज्याने गुंतवलेल्या भांडवलावर उच्चथ स्तरीय परतावा मिळवून दिला आहे."

About Evonith Steel :

Evonith Steel is the combination of Evonith Metallics Limited (EML) and Evonith Value Steel Limited (EVSL) which form the Steel Complex at Wardha. Evonith Steel is an integrated steel producer with a capacity of 1.4 mtpa. The facilities are strategically located in central India near Nagpur, Maharashtra with a captive railway siding and other essential infrastructure facilities, enabling access across all major markets countrywide and proximity to key raw materials. EML provides the hot metal/pig iron for EVSL and third parties to manufacture steel. EVSL manufactures steel from this hot metal to produce value added flat steel products such as hot rolled coils, cold rolled coils, galvanised coils and sheets, and in due course ductile iron pipes. 

To know more, visit https://www.evonithsteel.com/

Post a Comment

0 Comments