थोडक्यात पण महत्त्वाचे
हिडन लीफ व्हिलेजच्या दंतकथात्मक तत्त्वज्ञानातून प्रेरित ही नवी मालिका पुढील पिढीतील विद्यार्थ्यांना आपला ‘निंजा वे’ साध्य करण्यासाठी, प्रत्येक टप्प्यावर मार्गदर्शन करण्यासाठी तयार करण्यात आली आहे.
नागपूर एप्रिल 17 2026 : नवनीत समूहाच्या ‘युवा’या स्टेशनरी ब्रँडतर्फे अधिकृत नारुटो कलेक्शन ही प्रीमियम लाँगबुक्स, नोटबुक्स, स्पायरल लाँगबुक्स आणि ड्रॉइंग बुक्स यांचा समावेश असलेली ही विशेष श्रेणी लाँच केल्याची घोषणा करण्यात आली आहे. या सीरिजच्या माध्यमातून 'विल ऑफ फायर'ची प्रेरणादायी भावना थेट वर्गखोलीपर्यंत पोहोचवण्यात आली आहे. युवाची उच्च प्रतीची कागदी उत्पादने आणि नारुटोचे वैशिष्ट्यपूर्ण जग यांची सांगड घालत ही श्रेणी तयार करण्यात आली आहे. प्रत्येक विद्यार्थी आणि वापरकर्त्याला शिनोबीसारखे चिकाटीने आपले ध्येय साध्य करण्यासाठी प्रेरित करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. कल्पना रेखाटताना किंवा नोट्स घेताना आपला 'निंजा वे' साध्य करण्यासाठी आवश्यक साधने या कलेक्शनमधून उपलब्ध करून देण्यात आली आहेत.
नारुटो या मालिकेच्या प्रचंड सांस्कृतिक प्रभावातून ही भागीदारी साकारली आहे. ‘बिग थ्री’ अॅनिमे मालिकांपैकी एक म्हणून आजही या सीरिजचे वर्चस्व कायम आहे. 2002 मध्ये सुरुवात झाल्यानंतर एका तरुण निंजा गावाचे नेतृत्व करण्यापर्यंतच्या प्रवासाची ही कथा जागतिक स्तरावर यशाचा मापदंड ठरली आहे. अलीकडेच 2025 मधील जागतिक ओटीटी प्लॅटफॉर्मवरील अॅनिमे चार्ट्समध्येही या मालिकेने आघाडी राखली आहे. या प्रकारातील सर्व सीरिजमध्ये नारुटो विशेष ठरते.
या सीरिजने ज्याने केवळ पहिल्या सहामाहीतच 40 दशलक्ष तासांचा पाहण्याचा कालावधी नोंदवला आहे. युवाने या नव्या श्रेणीत हीच ऊर्जा प्रभावीपणे साकारली असून टीम 7मधील नारुटो, सासुके आणि साकुरा यांसह त्यांचे मार्गदर्शक काकाशी हाताके यांची वैशिष्ट्यपूर्ण सादरीकरणे या उत्पादनांमध्ये करण्यात आली आहेत. उच्च दर्जाची कागदी उत्पादने आणि अखंड चिकाटीचे प्रतीक असलेली ही सीरिज यांची सांगड घालत युवाने विद्यार्थ्यांना महत्त्वाकांक्षा आणि यशाची परंपरा प्रतिबिंबित करणारी साधने उपलब्ध करून दिली आहेत.
ही उत्पादन श्रेणी उपयुक्तता आणि आकर्षकता या दोन्ही बाबी लक्षात घेऊन तयार करण्यात आली आहे. नोट्स घेण्यासाठी उपयुक्त लाँगबुक्स, सोप्या वापरासाठी स्पायरल लाँगबुक्स, अधिक लेखनासाठी विस्तृत जागा देणाऱ्या जम्बो नोटबुक्स आणि सर्जनशील अभिव्यक्तीस प्रोत्साहन देणाऱ्या ड्रॉइंग बुक्स यांचा या श्रेणीत समावेश आहे. प्रत्येक उत्पादनामध्ये नारुटो-प्रेरित दृश्यांचा समावेश करण्यात आला असून त्यामुळे ही उत्पादने केवळ उपयुक्त स्टेशनरीपुरती मर्यादित न राहता विद्यार्थ्यांसाठी आणि चाहत्यांसाठी सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाची वस्तू ठरतात.
युवा स्टेशनरीचे चीफ स्ट्रॅटजी ऑफिसर अभिजीत सान्याल म्हणाले, “नारुटोच्या विश्वातील उत्साही ऊर्जा आमच्या नव्या युवा कलेक्शनमध्ये साकारताना आम्हाला आनंद होत आहे. ही भागीदारी केवळ स्टेशनरीपुरती मर्यादित नसून तरुणांच्या सर्जनशीलतेचा उत्सव साजरा करणाऱ्या ब्रँडचा आणि लाखो लोकांना मोठी स्वप्ने पाहण्याची प्रेरणा देणाऱ्या मालिकेचा संगम आहे. आमच्या विद्यार्थ्यांसाठी ही पात्रे वैयक्तिक प्रगतीच्या प्रभावी प्रवासाचे प्रतीक आहेत आणि आमच्या बुक्सचा वापर करून ते आपले भविष्य घडवताना हीच ऊर्जा आणि उत्साह दिसून येईल, हे पाहण्यास आम्ही उत्सुक आहोत.”
ही सीरिज नॉन-पेपर स्टेशनरी आणि अॅक्सेसरीजपर्यंत विस्तारण्याचा युवाचा विचार असून प्रत्येक विद्यार्थ्यासाठी संपूर्ण टूलकीट उपलब्ध करून देण्याचा उद्देश आहे. सध्या नारुटो कलेक्शन सर्व प्रमुख स्टेशनरी दुकानांमध्ये तसेच ऑनलाइन उपलब्ध आहे. तुमची साधने घ्या आणि तुमची स्वतःची कहाणी लिहायला सुरुवात करा. विश्वास ठेवा !

0 Comments