थोडक्यात पण महत्त्वाचे
दीर्घकाळ राहणाऱ्या त्वचा संसर्गांवरील उपचारातला आपला अधिकार मजबूत करत ब्रँडची “स्किन इन्फेक्शन का एक्सपर्ट सोल्यूशन” म्हणून पुनर्स्थापना; कंपनीतर्फे आपली नवीन प्रिकली हीट पावडर भारतभर सर्व प्रकारच्या विक्री प्लॅटफॉर्मवर उपलब्ध करून देत विस्तार !
मुंबई, 16.04.2026 – पिरामल कन्झ्युमर हेल्थकेअरचा प्रमुख ब्रँड टेटमोसोलतर्फे आज सुप्रसिद्ध अभिनेते पंकज त्रिपाठी यांना आपले नवीन ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून नियुक्त केल्याची घोषणा करण्यात आली. जोडीला नवीन मल्टिमीडिया मोहिमेची सुरुवातही करण्यात आली आहे. त्यायोगे ब्रँडला त्वचा संसर्गासाठीचा रामबाण उपाय म्हणून पुनर्स्थापित करण्यात आले आहे.
ही जाहिरात मोहीम एका वास्तव ग्राहक माहितीवर आधारित आहे: विशेषतः सक्रिय आणि घराबाहेर काम करण्याची जीवनशैली असलेले लाखो भारतीय उष्णता, घाम आणि स्वच्छतेशी संबंधित समस्यांशी नियमितपणे झुंज देतात. या परिस्थितींमुळे अनेकदा दीर्घकाळ टिकणारे, लवकर बरे न होणारे त्वचा संसर्ग होतात. यामुळे केवळ शारीरिक अस्वस्थताच येते असे नाही तर आत्मविश्वास आणि दैनंदिन उत्पादकतेवरही याचा परिणाम होतो.
ही जाहिरात मोहीम ग्राहकांच्या वर्तनातील एक महत्त्वपूर्ण तफावत देखील अधोरेखित करते. घरगुती उपाय आणि सामान्य साबण कधीकधी तात्पुरता आराम देऊ शकतात परंतु ते लवकर बऱ्या न होणाऱ्या म्हणजेच ‘जिद्दी’ त्वचा संसर्गांवर प्रभावी उपाय करण्यात अनेकदा अपयशी ठरतात. “स्किन इन्फेक्शन का एक्सपर्ट सोल्यूशन” म्हणून आपले स्थान आणखी बळकट करत टेटमोसोल अशा दीर्घकाळ टिकणाऱ्या त्वचा संसर्गांसाठी एक विश्वासार्ह, परिणामकारक उपाय म्हणून स्वतःला सादर करते.
या धोरणात्मक बदलाचा एक भाग म्हणून टेटमोसोलने आपल्या पोर्टफोलिओच्या विस्ताराची देखील घोषणा केली आहे. यामध्ये टेटमोसोल प्रिकली हीट पावडरचे संपूर्ण भारतातील सादरीकरण समाविष्ट आहे. या माध्यमातून उन्हाळ्याशी संबंधित त्वचा आरोग्य आणि स्वच्छता या श्रेणींमध्ये प्रवेश करण्यात येत आहे. हे पाऊल उचलल्यामुळे ऑफलाइन रिटेल, ई-कॉमर्स आणि क्विक कॉमर्स प्लॅटफॉर्मवर ब्रँडचे सर्व प्रकारच्या विक्री प्लॅटफॉर्मवरील स्थान अधिक मजबूत होईल, तसेच सुपरमार्केट आणि मॉडर्न ट्रेडसारख्या नॉन-केमिस्ट चॅनेल्समध्ये प्रवेश मिळवून पोहोच आणि उपलब्धता वाढवण्यास मदत होईल.
या घोषणेबाबत भाष्य करताना पिरामल कन्झ्युमर हेल्थकेअरचे मुख्य कार्यकारी अधिकारी साई पोनुगोटी म्हणाले, "टेटमोसोलवर ग्राहकांनी त्वचा संसर्गांवरील प्रभावी उपचारासाठी दीर्घकाळ विश्वास ठेवला आहे. आमच्या नवीन जाहिरात मोहिमेसह आणि “स्किन इन्फेक्शन का एक्सपर्ट सोल्यूशन” म्हणून स्वतःचे स्थान आणखी मजबूत करत आम्ही दीर्घकाळ राहणाऱ्या त्वचा संसर्गांवर उपाय करण्यावर अधिक लक्ष केंद्रित करत आहोत. त्याचवेळी त्वचा संसर्गांवरील प्रभावी उपाय म्हणून ब्रँडचा अधिकार मजबूत करत आहोत.
या सहयोगातून पंकज त्रिपाठी यांच्याशी जोडले जाणे ही खूप स्वाभाविक गोष्ट आहे — त्यांची प्रामाणिकता, सुसंगतता आणि विश्वासार्हता आमच्या ब्रँड मूल्यांशी घट्ट जुळते आणि हा संदेश अधिक प्रभावीपणे पोहोचवण्यास मदत करते. यासोबतच, प्रिकली हीटसारख्या उत्पादनाच्या माध्यमातून दुसऱ्या श्रेणींमध्ये आम्ही विस्तार करत आहोत. भारतीय ग्राहकांसाठी त्वचा आरोग्याच्या क्षेत्रात टेटमोसोलची अधिक व्यापक आणि विश्वासार्ह भागीदार म्हणून भूमिका मजबूत करण्याच्या आमच्या उद्देशाचे हे प्रतिबिंब आहे. केवळ कार्यात्मक परिणामकारकतेच्या पलीकडे जाऊन आमची नवीन जाहिरात मोहीम त्वचा आरोग्य, आत्मविश्वास आणि दैनंदिन कामगिरीतील संबंध अधोरेखित करते. यामुळे व्यक्तींना त्वचा आरोग्याशी संबंधित समस्यांवर प्रभावीपणे मात करता येते आणि त्यांना महत्त्वाच्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करता येते. तसेच भारताला त्वचा संसर्गांपासून मुक्त जीवन जगण्यास मदत करण्याच्या आमच्या ध्येयाला पुढे नेते."
या सहयोगाबद्दल बोलताना पंकज त्रिपाठी म्हणाले, “सर्वात प्रभावी कथा दैनंदिन वास्तवातून येत असतात. त्वचा संसर्ग ही अशी गोष्ट आहे ज्याचा अनेक लोक त्यांच्या दैनंदिन जीवनात सामना करतात, परंतु त्याचा त्यांच्या उत्पादकता आणि आत्मविश्वासावर परिणाम होईपर्यंत त्याकडे पुरेसे लक्ष दिले जात नाही. टेटमोसोलबद्दल मला आवडणारी गोष्ट म्हणजे त्वचा संसर्गांपासून प्रभावी आराम देण्यासाठी असलेला त्यांचा स्पष्ट, उपाय-केंद्रित दृष्टिकोन. एका खऱ्या, दैनंदिन समस्येला समजून घेणाऱ्या आणि लोकांना त्यांच्या स्वतःच्या त्वचेबाबत अधिक आत्मविश्वास वाटण्यास मदत करणाऱ्या ब्रँडशी जोडले गेल्याचा मला आनंद आहे."
ही मोहीम आणि श्रेणी विस्तारासह, टेटमोसोल ग्राहक सहभाग अधिक सखोल करण्याचा, नवीन वापराच्या प्रसंगांमध्ये आणि चॅनेल्समध्ये विस्तार करण्याचा आणि त्वचा संसर्ग उपायांमध्ये विश्वासार्ह तज्ज्ञ म्हणून आपले नेतृत्व अधिक बळकट करण्याचा उद्देश ठेवत आहे.
मोहिमेसाठीची यू ट्यूब लिंक - https://youtu.be/JwZ7Z4Fp0pw

0 Comments